बंदिस्त गटारींसह रस्त्यांचे डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 09:52 PM2020-06-01T21:52:39+5:302020-06-02T00:48:56+5:30
सिन्नर : शिवाजीनगर भागातील अक्षय गृहनिर्माण संस्था परिसर वीस वर्षांपासून विकासापासून वंचित होता. कोणतीही विकासकामे, मूलभूत सुविधा झाल्या नव्हत्या. सिन्नर नगर परिषदेने ५९ लाख रुपये खर्चातून बंदिस्त गटारी, रस्ते डांबरीकरणाने परिसराला नवे रूप दिले आहे. या कामाचे रहिवाशांनी स्वागत केले.

अनेक वर्षांपासून विकासापासून दूर असलेल्या या भागाचे रूप बदलवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवाजीनगरातील भिकुसा शाळेजवळील अक्षय गृहनिर्माण संस्था परिसरात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक शैलेश नाईक, सुजाता भगत यांनी या कामांसाठी पाठपुरावा केला होता. नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे यांचे त्यांना पाठबळ मिळाले. रस्त्याला मोठे खड्डे, सांडपाणी अव्यवस्थेने नागरिक त्रस्त होते. नाशिक-पुणे महामार्ग, भिकुसा विद्यालय, इच्छामणी मंदिर भागातल्या वर्दळीचा परिसर असलेला हा भाग विकासापासून दूर होता. परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असल्याने वाहन धारकांची अडचण होत होती. सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने घाण-पाणी एकमेकांच्या दारासमोरून वाहत होते. त्यामुळे अनेकांत भांडणेही होत. परिसरात मूलभूत सुविधा होण्याची मागणी अनेक वर्षापासून होती. अखेर ती पूर्ण झाली आहे.