शहरात दीडशे कोटींचे डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:14 AM2021-03-18T04:14:55+5:302021-03-18T04:14:55+5:30
कोरोनामुळे वृक्षारोपण रखडले नाशिक- महापालिकेने दरवर्षी प्रमाणे दहा हजार वृक्ष लावण्याचे नियोजन केले असले तरी केारोनाचा फटका बसल्याने अपेक्षीत ...
कोरोनामुळे वृक्षारोपण रखडले
नाशिक- महापालिकेने दरवर्षी प्रमाणे दहा हजार वृक्ष लावण्याचे नियोजन केले असले तरी केारोनाचा फटका बसल्याने अपेक्षीत वृक्षारोपड झालेले नाही. कोरोना काळामुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन असल्याने विलंबाने काम देण्यात आले. परंतु सध्या तर उन्हाळ्याचे दिवस असून आता पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
----
महापालिकेत निर्बंधामुळे गर्दीत घट
नाशिक- कोरेाना संसर्ग टाळण्याासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेच्या मुख्यालयात येणाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे प्रवेशव्दारावर सुरक्षा रक्षक विचारपूस करू लागल्याने आता गर्दीत घट झाली आहे. महापालिकेत येऊन थेट तक्रार करण्याऐवजी ऑनलाईन तक्रारी कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
---
पुन्हा थाटली मास्कची दुकाने
नाशिक- शहरात मास्कच्या सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्याने आता पुन्हा रस्त्यांवर मास्क विक्रेते दिसु लागले आहेत. अर्थात बहुतांशी विक्रेत्यांनी मास्क हे प्लास्टीक बॅगमध्ये ठेवले आहेत. महापालिका आणि पोलीस सध्या मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत.