माळरानावर पिकवली आकांक्षा काकडी

By Admin | Published: January 16, 2017 01:04 AM2017-01-16T01:04:57+5:302017-01-16T01:05:29+5:30

भरघोस उत्पन्न : खेडभैरव येथील शेतकऱ्याच्या कष्टाला यश

Aspiration crazy | माळरानावर पिकवली आकांक्षा काकडी

माळरानावर पिकवली आकांक्षा काकडी

googlenewsNext

 लक्ष्मण सोनवणे  बेलगाव कुऱ्हे
एकीकडे कर्जबाजारीपणा आणि बाजारभावातील अनियमतता असताना त्याच परिस्थितीत दुसरीकडे तालुक्यातील कैलास वाजे या खेडभैरव गावातील शेतकऱ्याने जिद्दीच्या बळावर दगडाळ, मुरमाट पडीक अन दुर्लक्षित असलेल्या माळरानावर एक एकरच्या शेतीत बंगलोर येथील नेत्रा सिड्सची संकरित आकांक्षा या सुधारित वाणाची लागवड करून आधुनिक पद्धतीने काकडीचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे.
यामुळे दररोज साठ ते सत्तर या काकडीच्या जाळ्या नाशिकला विक्रीसाठी ते नेतात. यातून त्यांना दररोज उत्पन्नदेखील चांगले मिळत आहे. त्यांनी बेंगळुरू येथील नेत्रा सिड्सच्या मदतीने किरण मांडे यांनी आधुनिक शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले असून ते शेतीबद्दलचे उपयुक्त असे ज्ञान त्यांना देत आहेत.या प्रयोगामुळे त्यांना विक्रमी उत्पादन मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. शेतीविषयक अभ्यास करून स्वत:च्या पोटच्या मुलासारखी काकडीची काळजी घेत त्यांनी निसर्गाच्या चहूबाजूने येणाऱ्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
गेल्या काही वर्षाच्या कालखंडात निसर्गाने शेतकऱ्यांची हवी तशी साथ दिलेली नसतानादेखील त्यांनी कोणत्याही बाबीची पर्वा न करता ड्रीप पद्धतीने काकडी जगविली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात नक्कीच असतो. याप्रमाणे नवीन प्रयोगात त्यांची पत्नी वंदनादेखील त्यांना सातत्याने मदत करीत असतात.
इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांपुढे अनेक संकटे उभी असताना तालुक्यातील या शेतकऱ्याने खचून न जाता डबघाईला आलेली कौटुंबिक अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भाजीपाला शेतीचा नवा पर्याय निवडला. अनेक पारंपरिक पिकांचे काटेकोर नियोजन करत नवनवीन प्रयोग केले. त्यातून आर्थिक घडी बसवली. त्यांच्या या प्रयोगाला यश आले. त्यामुळे इतर शेतकरीही आता त्यांची बाग पाहण्यासाठी रांगा लावत आहेत. वाजे यांच्या कष्टाला मिळालेली ती पावतीच आहे!

Web Title: Aspiration crazy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.