अफगाणी ‘रेफ्यूजी’ जरीफ बाबा चिश्ती यांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 01:58 AM2022-07-07T01:58:28+5:302022-07-07T01:58:58+5:30

मूळ अफगाणिस्तानचे निर्वासित (रेफ्यूजी) भारतीय असलेले ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफ बाबा (२९) यांचा नाशिकमधील येवल्यात गोळी झाडून खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात व देशात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. ५) रात्री आठ वाजता दरम्यान ही घटना घडल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. मालमत्तेच्या वादातून चिश्ती यांचा कारचालक व सेवाकऱ्याने संगनमताने गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Assassination of Afghan 'Refugee' Zarif Baba Chishti | अफगाणी ‘रेफ्यूजी’ जरीफ बाबा चिश्ती यांचा खून

अफगाणी ‘रेफ्यूजी’ जरीफ बाबा चिश्ती यांचा खून

Next
ठळक मुद्देसंशयित ताब्यात : कारचालकाने येवल्यात झाडली गोळी; सेवेकरी व चालक कार घेऊन फरार

नाशिक : मूळ अफगाणिस्तानचे निर्वासित (रेफ्यूजी) भारतीय असलेले ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफ बाबा (२९) यांचा नाशिकमधील येवल्यात गोळी झाडून खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात व देशात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. ५) रात्री आठ वाजता दरम्यान ही घटना घडल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. मालमत्तेच्या वादातून चिश्ती यांचा कारचालक व सेवाकऱ्याने संगनमताने गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

सोशल मीडियावर सुफी संत म्हणवून घेत प्रसिद्ध असलेले जरीफ बाबा यांचा यूट्यूब, फेसबुक, ट्विटरवर मोठा चाहता वर्ग आहे. अफगाणिस्तानातून ते चार वर्षांपूर्वी भारतात स्थलांतर करून निर्वासित म्हणून वास्तव्यास आले होते. भारत सरकारने त्यांना निर्वासित म्हणून राहण्याची परवानगी दिली होती, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खोलीत भाडेतत्त्वावर पत्नी तरीना हिच्यासोबत राहत होते. त्यांच्यासोबत एक विदेशी महिलादेखील वास्तव्यास असून त्या प्रथमदर्शनी अफगाणी असल्याचे समोर येत असल्याचे पाटील म्हणाले.

दरम्यान, जरीफ बाबा हे मंगळवारी दुपारी सिन्नरमधून त्यांच्या तीन ते चार प्रमुख सेवेकऱ्यांसह कार (एम.एच. ४३-बीयु - ७८८६) ने येवल्यात दाखल झाले. तेथे एक ते दोन पूजाविधीचे कार्यक्रम पार पाडले. यानंतर जेवण केले. चिंचोडी एमआयडीसीमध्ये एका भूखंडाची खरेदी करायची आहे, त्याचे भूमिपूजन करण्याकरिता जायचे असल्याचे सांगून सेवेकरी बाबाला तेथे घेऊन गेले. संध्याकाळच्या सुमारास बाबाला तेथे नेले. पूजाविधी आटोपून ते कारमध्ये बसत असताना कारचालकाने त्यांच्यावर पिस्तूलने गोळी झाडली. गोळी थेट डोक्यात शिरल्याने बाबाचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अफजल अहमद कुर्बान खान (३४) रा. सिन्नर, मुळ उत्तर पदेश याच्या फिर्यादीवरून येवला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बाबाच्या एका सेवेकऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संध्याकाळी तपासी पथकाला हल्लेखोरांनी वापरलेली बाबाची कार श्रीरामपुर येथे बेवारस आढळली.

--इन्फो--

दीड वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्य

सुफी जरीफ बाबा चिश्ती हे एका विदेशी महिलेसोबत मागील दीड वर्षांपासून नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास होते. त्यांच्यासोबत एक परदेशी महिलादेखील असल्याचे तपासात समोर आले आहे; मात्र ही महिला या सगळ्या घटनेपासून अनभिज्ञ असून ती विदेशी असून तिला स्थानिक कुठलीही भाषा समजत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मौजे वावी गावाच्या शिवारात जरीफ बाबा हा एका खोलीत भाडेतत्त्वावर राहत होता.

Web Title: Assassination of Afghan 'Refugee' Zarif Baba Chishti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.