दापूरला वीज वितरणविरोधात प्रहारचे आसूड आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:15 AM2021-03-16T04:15:24+5:302021-03-16T04:15:24+5:30
प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वीज बिल ...
प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वीज बिल वसुली थांबवा, वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम थांबवा आदींसह विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या. वीज वितरणचे अभियंता चौधरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांचे बंद केलेले ट्रान्सफॉर्मर (डीपी) व कट केलेले वीज कनेक्शन सुरू करा, शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून चालली असून, त्यांना जीवदान द्या आदींसह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोरोनामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यात संपूर्ण हंगाम कष्ट करून घेतलेले रबीचे पीक जवळ येत असताना वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ऊर्जामंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. शासनाने शेतकरी व जनतेचा अंत पाहू नका; अन्यथा शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. शासनाने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनात तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्यासह शहराध्यक्ष दौलत धनगर, संदीप लोंढे, बापू सानप, अर्जुन घोरपडे, मनुभाऊ आव्हाड, शिवाजी गुंजाळ यांच्यासह अर्जुन आव्हाड, अशोक साबळे, तुकाराम आव्हाड, बाळकृष्ण आव्हाड, निवृत्ती पालवे, सुनील आव्हाड, सोमनाथ आंधळे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
फोटो ओळी- १५ दापूर आंदोलन
दापूर येथे प्रहारच्या आसूड आंदोलनात सहभागी झालेले शरद शिंदे, दौलत धनगर, संदीप लोंढे, बापू सानप, अर्जुन घोरपडे, मनुभाऊ आव्हाड, शिवाजी गुंजाळ व शेतकरी.
===Photopath===
150321\15nsk_29_15032021_13.jpg
===Caption===
दापूर येथे प्रहारच्या आसूड आंदोलनात सहभागी झालेले शरद शिंदे, दौलत धनगर, संदीप लोंढे, बापू सानप, अर्जून घोरपडे, मनूभाऊ आव्हाड, शिवाजी गुंजाळ व शेतकरी.