‘समृद्धी’ला जमीन देण्यास सिन्नर आघाडीवर मूल्यांकन प्रारंभ : आठवड्यात घेणार जागेचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:24 AM2017-08-03T00:24:53+5:302017-08-03T00:44:39+5:30
नाशिक : मुंबई-नागपूर ‘समृद्धी’ महामार्गाला जमीन मोजणीपासूनच विरोध करून अधिकाºयांना पिटाळून लावणाºया सिन्नर तालुक्यातच या महामार्गासाठी जमीन देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने पुढे आल्यामुळे प्रशासनातील अधिकाºयांना हायसे वाटू लागले असून, दोन दिवसांपूर्वी जवळपास २२५ शेतकºयांनी एकत्र येत लेखी निवेदनाद्वारे जमीन देण्याची तयारी दर्शविल्याने या जमिनीचे मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्णातील शेतकºयांचा यापूर्वीचा विरोध हळूहळू मावळत चालल्याचे दिसू लागले असून, गेल्या आठवड्यात पंधरा शेतकºयांकडून थेट खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर अन्य गावांतील शेतकºयांकडूनही त्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सिन्नर तालुक्यातून समृद्धी महामार्गासाठी सर्वाधिक विरोध यापूर्वी करण्यात आला होता. अधिकाºयांना ड्रोनद्वारे जमिनीची मोजणीही न करू देणाºया ग्रामस्थांनी मोजणी करण्यास येणाºया अधिकाºयांना पिटाळून लावले होते तसेच जमिनीवरच सरण रचून प्रशासनावर विरोधाचा दबाव कायम ठेवला होता. परंतु राज्य रस्ते विकास महामंडळाने जमिनींचे दर जाहीर केल्यानंतर शेतकºयांचा विरोध मावळत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी गोंदे, मºहळ बुद्रुक, मºहळ खुर्द, खंबाळे, सायाळे, दातली आदी लगतच्या गावातील शेतकºयांनी एकत्र येत प्रशासनाला लेखी निवेदन देऊन जमीन विक्रीची तयारी दर्शविली आहे. सिन्नरच्या मानाने इगतपुरी तालुक्यातील शेतकरी जमिनी देण्यास अद्याप फारसे पुढे आलेले नाहीत. मंगळवारी इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे आणखी एका शेतकºयाने थेट खरेदी दिली आहे. १३ कोटी अदाशेतकºयांचा मिळणारा प्रतिसाद पाहता ज्यांनी जागा देण्याची तयारी दर्शविली त्यांच्या गटनिहाय व गटातील मालमत्तेचे मूल्यांकन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जमिनी खरेदी केल्यानंतर तत्काळ शेतकºयाच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येत असल्याने गेल्या आठवड्यात १३ कोटी रुपये जमिनीचा मोबदला अदा करण्यात आला आहे. शासनाने समृद्धीसाठी पैसे कमी न पडू देण्याचे यापूर्वीच जाहीर केल्यामुळे येत्या आठवड्यात पुन्हा काही शेतकºयांच्या जमिनींचे व्यवहार पूर्ण केले जातील, अशी माहिती समृद्धीचे समन्वयक विठ्ठल सोनवणे यांनी दिली आहे.