पेठ तालुक्यातील ११०० कष्टकऱ्यांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 11:41 PM2020-04-05T23:41:10+5:302020-04-05T23:41:56+5:30
पेठ : कोरोनाच्या जीवघेण्या संकटाच्या सावटात असलेल्या पेठ तालुक्यातील ११०० कष्टकऱ्यांची चूल पेटविण्यासाठी थेट अमेरिकेतून मदत आल्याने एक प्रकारे सामाजिक बांधीलकीच जपली आहे.
पेठ : कोरोनाच्या जीवघेण्या संकटाच्या सावटात असलेल्या पेठ तालुक्यातील ११०० कष्टकऱ्यांची चूल पेटविण्यासाठी थेट अमेरिकेतून मदत आल्याने एक प्रकारे सामाजिक बांधीलकीच जपली आहे.
नाशिकच्या सोशल नेटवर्किंगतर्फे गरीब कष्टकºयांच्या घरातील चूल दोन वेळा पेटती रहावी यासाठी समाजमाध्यमांतून मदतीचे आवाहन केले होते. या अभियानाला देशातूनच नव्हे तर थेट अमेरिकेतूनही प्रतिसाद मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगावचे सुपुत्र योगेश कासट आणि त्यांचे मित्र हैदराबाद येथील राहुल मोहता, संकेत शहा, संदीप शुक्ल, जॅसन यांनी पेठ तालुक्यातील ११०० कुटुंबीयांसाठी १५ दिवसांचे अन्नधान्य घेऊन दिले.
याशिवाय लोकसहभागातून अजून पाच हजार लोकांना अन्नधान्याची मदत पोहोचवण्यासाठी फोरम कार्यरत आहे. अध्यक्ष प्रमोद गायकवाड, रामदास शिंदे, संदीप बत्तासे, विजय भरसट, डॉ. नीलेश पाटील, सर्व गावांचे ग्रामसेवक, सरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने सदरचे साहित्य वाटप करण्यात
आले.