गुळवंच ग्रामपंचायतीकडून अंगणवाड्यांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 06:08 PM2020-03-19T18:08:39+5:302020-03-19T18:09:06+5:30
सिन्नर: तालुक्यातील गुळवंच ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोग अनुदानातून महिला बालकल्याण विकास योजनेसाठी राखीव निधीतून अंगणवाड्यांसाठी धान्य साठवणुकीसाठी व अन्न शिजवण्यासाठी भांडी उपलब्ध करून दिली आहेत.
Next
ग्रामपंचायतीला प्राप्त अनुदानांपैकी १० टक्के निधी महिला व बालकांच्या हितासाठी खर्च करण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार सुमारे १ लाख २० हजार रुपयांच्या निधीतून गावातील चार व दगडवाडी, गंगाजींचा मळा या अंगणवाड्यांसाठी भांडी खरेदी करण्यात आली. धान्य साठवणूकीसाठी कोठी, रॅक, डब्बे, मोठे पातेले, पाण्याची टाकी आदी साहित्याचे वितरण या अंगणवाड्यांना नुकतेच करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या कार्यक्र मासाठी सरपंच केशव कांगणे, माजी उपसरपंच भाऊदास शिरसाट, बबाबाई सानप, सदस्य संगिता कांदळकर, ग्रामविकास अधिकारी अनिल कानवडे यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.