ओखी वादळाच्या प्रभावामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:49 AM2017-12-09T00:49:47+5:302017-12-09T00:50:52+5:30

Assistance to damaged farmers due to oak storm impact | ओखी वादळाच्या प्रभावामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत

ओखी वादळाच्या प्रभावामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत

googlenewsNext

नाशिक : महाराष्ट्राच्या समुद्रकिनाºयावर धडकलेल्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊन शेतकºयांच्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, खळ्यावर पडलेल्या खरीप पिकाचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकºयांना मदत करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने शुक्रवारी (दि.८) संमत केला आहे.  कृषी समिती सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा समितीच्या अध्यक्ष नयना गावित यांच्या अध्यक्षतेत झाली. शेतकºयांना २०१७च्या रब्बी हंगामासाठी हरभरा व गहू बियाण्यांच्या ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमासाठी अनुदानावर गहू बियाण्याचे लोकवाण-०१, जी डब्ल्यू-४९६, त्र्यंबक, एमआयडब्लू-९१७, एमएससीएस-६२२२, नेत्रावती, एचआय-१५४४, पोषण, एचडी-२९८७, राज-४०३७, एचआय-१४१८ एका शेतकºयांसाठी ४० किलो व हरभºयाचे विजय वान एका शेतकºयास २० किलोप्रमाणे कृषिनिविष्ठा विक्री केंद्रामार्फत देण्यात येत असल्याची माहिती देतानाच शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही कृषी समिती सभापती नयना गावित यांनी केले आहे. सभेसाठी समितीचे सदस्य एकनाथ गायकवाड, लता बच्छाव, पुष्पा गवळी, ज्योती वाघले, ज्योती राऊत, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 
सानुग्रह अनुदान देणार
जिल्ह्यातील १३ जळीत शेतकºयांना सानुग्रह अनुदान म्हणून कृषी समितीमार्फत मदत करण्यासही या सभेत मंजुरी देण्यात आली. यात निफाड तालुक्यातील ११, तर बागलाण व सुरगाणा प्रत्येकी एक असे एकूण  १३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
हाराष्ट्र शासनाने २४ नोव्हेंबरला काढलेल्या राजपत्रानुसार कीटकनाशक परवान्याविषयीचे कामकाज जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले.

Web Title: Assistance to damaged farmers due to oak storm impact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.