ताहाराबाद येथे पाचशे कुटुंबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:08 PM2020-04-08T23:08:49+5:302020-04-08T23:09:12+5:30
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर ताहाराबाद येथे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांच्या पुढाकाराने पाचशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे.
ताहाराबाद : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर ताहाराबाद येथे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांच्या पुढाकाराने पाचशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यात तांदूळ, डाळ, तेल, मीठ, साखर, चहा, बिस्किट, साबण, सॅनिटायझर, भाजीपाला आदी साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. जायखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच काशीनाथ नंदन, संदीप साळवे, ज्ञानेश्वर नंदन, सुनील जाधव, सचिन कोठावदे, राजेंद्र साळवे, प्रकाश केला, गोविंद महाजन, किशोर साळवे, अशोक नंदन, गणेश नंदन, नितीन घरटे, कुणाल नंदन, पुंडलिक देशमुख, दिनेश नंदन, मोहन महाजन, हर्षल सोनवणे, भूषण जाधव, निखिल कासारे, दीपक कांकरिया आदी उपस्थित होते.