शहीद शिंदे यांच्या परिवारास मदत
By admin | Published: March 9, 2016 10:24 PM2016-03-09T22:24:11+5:302016-03-09T22:35:47+5:30
शहीद शिंदे यांच्या परिवारास मदत
चांदवड : येथील श्री नेमिनाथ
जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित एचएचजेबी तंत्रनिकेतन, चांदवड व कोपरगाव येथील सोनतारा भन्साळी ट्रस्ट यांच्या वतीने भयाळे येथील शहीद जवान शंकर शिंदे यांच्या कुटुंबीयांस ४१ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
तंत्रनिकेतनचे स्नेहसंमेलन साजरे होत असताना ही घटना समजताच तंत्रनिकेतनचे समन्वयक अरविंद भन्साळी यांनी पुढाकार घेऊन स्नेहसंमेलनाच्या खर्चात बचत करून ११ हजार रुपये व कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी यांनी एकत्रित २६ हजार रुपये संकलित केले, तर सोनतारा भन्साळी ट्रस्ट यांनी चार हजार असे एकूण ४१ हजार रुपयांची मदत प्रबंध समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, सदस्य अरविंद
भन्साळी, राजकुमार बंब, महावीर पारख, दिनेशकुमार लोढा, प्राचार्य सी. आर. नानावटी, प्रा. आर. सी. तिवारी, पी. एम. बाफना, डी. व्ही. लोहार, एम. जी. जैन, के. बी. गुप्ता, व्ही. टी. महाजन, के. पी. वाघ, पी.पी. मुथा, बी. एस. कुवर आदिंनी भयाळे येथे जाऊन शहीद शंकर शिंदे यांच्या पत्नी सुवर्णा शिंदे यांना २०
हजार ५०० रुपये अरविंद भन्साळी यांच्या हस्ते, तर वडील चंद्रभान शिंदे यांना २० हजार ५०० रुपये बेबीलाल संचेती यांच्या हस्ते देण्यात
आले. भविष्यात शहीद शंकर शिंदे यांच्या मुलांना शिक्षणासाठी सहकार्य केले जाईल, असे संस्थेच्या वतीने आश्वासन देण्यात आले. (वार्ताहर)