कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर नुकसानग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:18 AM2021-09-12T04:18:54+5:302021-09-12T04:18:54+5:30
नांदगाव मध्यवर्ती प्रशासकीय संकुलातील सभागृहात नांदगाव व मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टी बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी भुजबळ ...
नांदगाव मध्यवर्ती प्रशासकीय संकुलातील सभागृहात नांदगाव व मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टी बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार सुहास कांदे, जिल्हा परिषद सदस्य अश्विनी आहेर, पंचायत समिती सदस्य सुभाष कुटे, माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, सोपान कासार, तहसीलदार चंद्रजित राजपूत, दीपक पाटील यांच्यासह दोनही तालुक्यातील गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येत असून त्याच धर्तीवर जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत देणार आहे. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील जाटपाडे व नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे