शहीद गोसावी कुटुंबियांना सिन्नर पंचायत समितीकडून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:40 PM2018-11-14T17:40:34+5:302018-11-14T17:40:53+5:30
सिन्नर : शहीद जवान नायक केशव गोसावी यांचे कुटुंबियांना सिन्नर पंचायत समिती, सिन्नर तालुका ग्रामसेवक युनियन व नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने तातडीची आर्थिक मदत सुपुर्द करण्यात आली.
सिन्नर : शहीद जवान नायक केशव गोसावी यांचे कुटुंबियांना सिन्नर पंचायत समिती, सिन्नर तालुका ग्रामसेवक युनियन व नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने तातडीची आर्थिक मदत सुपुर्द करण्यात आली.
सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील सैन्य दलाच्या २४ मराठा बटालीयनमधे नेमणुकीवर असलेले जवान नायक केशव गोसावी हे रविवार दि. ११ रोजी जम्मु काश्मीर नौशेरा भागात पाकच्या हल्ल्यात शहीद झाले. त्यांचे कुटुंबिय व संपुर्ण शिंदेवाडी गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्या दु:खातुन सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो अशा शब्दात आदरांजली पंचायत समितीच्या वतीने वाहण्यात आली.
शहीद जवानाचे पश्चात अपंग वडील, पत्नी व विवाहीत बहीण असा परिवार आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. सिन्नर तालुका ग्रामसेवक युनियनच्या वतीने रोख रक्कम २५ हजार रुपये आर्थिक मदत आज शहीद जवानाचे वडील सोमगीर गोसावी यांचेकडे सुपुर्द केली. सिन्नर पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यावतीने रोख ३१ हजार रुपये आर्थिक मदत शहीद जवानाचे वडीलांकडे सुपुर्द केली.
तसेच नाशिक जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे वतीने शहीद जवानाचे कुटुंबियांस दिली जाणाऱ्या आर्थिक मदत म्हणून २१ हजार रुपयांचा धनादेश विर पत्नी यशोदा केशव गोसावी यांच्या नावाने सुपुर्द करण्यात आला.
यावेळी सिन्नर पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, गटनेते संग्राम कातकाडे, गटनेते विजय गडाख, गटविकास आधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षण अधिकारी शिवनाथ निर्मळ, बालविकास प्रकल्प अधिकारी गोरख शेवाळे, नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे, ग्रामसेवक युनियनचे तालुकाध्यक्ष संजय गिरी, कृषी अधिकारी कैलास भदाणे, पशुधन विकास अधिकारी डॉ.मिलींद भणगे, लेखाधिकारी विजय आघाव, ग्रामसेवक युनियन तालुका सचिव जालींदर वाडगे, सहसचिव प्रमोद शिरोळे, संघटक संदीप देवरे, विस्तार अधिकारी संजय मोरे, शिंदेवाडीच्या सरपंच लक्ष्मीबाई हांडोरे, उपसरपंच दत्तु खाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.