गुटख्यासह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 12:55 AM2019-03-22T00:55:30+5:302019-03-22T00:55:55+5:30
जायखेडा : गुजरातहून महाराष्ट्रात चोरट्यामार्गाने येणाऱ्या चार लाख बत्तीस हजार रुपयांचा गुटखा व तीन लाख रु पये किमतीची मिनी ...
जायखेडा : गुजरातहून महाराष्ट्रात चोरट्यामार्गाने येणाऱ्या चार लाख बत्तीस हजार रुपयांचा गुटखा व तीन लाख रु पये किमतीची मिनी पिकअप असा सात लाख बत्तीस हजार रु पये किमतीचा मुद्देमाल जायखेडा पोलिसांनी जप्त केला. बागलाण तालुक्यातील आलियाबाद गावाजवळ सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव व त्यांच्या टीमने ही धडक कारवाई केली. याप्रकरणी अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना जायखेडा पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गुजरातकडून महाराष्ट्राकडे येत असलेली मिनी पिकअपची (क्र. एमएच २०/ ईजी २४१४) हरणबारी - अलियाबाद दरम्यान तपासणी केली असता, आरोपी शेख गुलाम बाबूलाल (रा. औरंगाबाद), शंकर धनराज पाचपुते (रा. मोठा नाका, बालाजीनगर, औरंगाबाद), जितेंद्र अशोक परदेशी (रा. कुंडलीनगर, औरंगाबाद) हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची गुजरातहून महाराष्ट्रात अवैधरीत्या वाहतूक करताना आढळून आले.
याप्रकरणी अन्न व औषध सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील, हवालदार सोनवणे करीत आहेत.
गुटखा, तंबाखू केली जप्त
वाहतुकीसाठी वापरलेली मिनी पिकअप (किमत सुमारे तीन लाख रु पये) तसेच हिरा पान मसाला दोन लाख अठ्ठ्यांशी हजार रु पये किमतीच्या गुटख्याची शंभर पाकिटे व रॉयल नावाच्या तंबाखूची एक लाख चौरेचाळीस हजार रुपये किमतीची शंभर पाकिटे असा एकूण सात लाख बत्तीस हजार रु पये किमतीचा मुद्देमाल जायखेडा पोलिसांनी जप्त केला.