अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 11:16 PM2020-08-04T23:16:33+5:302020-08-05T01:18:55+5:30

नाशिक : शहर आणि तालुक्याचा परिसर मुख्यत्वे पश्चिम वनविभाच्या अखत्यारितीत येतो. दारणाकाठावर सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. पश्चिम वनविभागाने बिबटे जेरबंद करण्यासाठी अन्य शहरांमधून पिंजऱ्यांची जमवाजमव केली असली तरी पुरेशी साधनसामुग्रीच्या अभावामुळे प्रत्यक्षरीत्या घटनास्थळावर वनअधिकारी व कर्मचाºयांची तारांबळ उडून दमछाक होत आहे.

Asthma due to insufficient equipment | अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे दमछाक

अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे दमछाक

Next
ठळक मुद्देपश्चिम वनविभाग : विहिरीतील वन्यजीव ‘रेस्क्यू’ करताना तारांबळ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहर आणि तालुक्याचा परिसर मुख्यत्वे पश्चिम वनविभाच्या अखत्यारितीत येतो. दारणाकाठावर सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. पश्चिम वनविभागाने बिबटे जेरबंद करण्यासाठी अन्य शहरांमधून पिंजऱ्यांची जमवाजमव केली असली तरी पुरेशी साधनसामुग्रीच्या अभावामुळे प्रत्यक्षरीत्या घटनास्थळावर वनअधिकारी व कर्मचाºयांची तारांबळ उडून दमछाक होत आहे.
पश्चिम वनविभागाकडे बिबट्यासारख्या वन्यजिवांच्या रेस्क्यूकरिता साधनसामुग्री नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. चाडेगाव शिवारात आठवड्यापूर्वी धोकादायक विहिरीत पडलेला बिबट्या रेस्क्यू करण्याचे आव्हान कौशल्यपूर्ण पद्धतीने अपुºया व अयोग्य साधनसामुग्रीच्या बळावर वन अधिकारी व कर्मचाºयांनी लिलयापणे पेलले; मात्र यावेळी बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यास स्वत:लाही सुरक्षित ठेवताना मोठी कसरत कर्मचाºयांना करावी लागली. वनविभागाकडे विहिरीत कोसळलेले वन्यजीव बाहेर काढण्यासाठी कमी वजनाचा लहान पिंजराच अद्याप उपलब्ध नाही. यामुळे मोठा जड पिंजरा कर्मचाºयांना वापरात आणावा लागतो. औषधोपचार पिंजºयाअभावी हेळसांडपश्चिम वनविभागाच्या हद्दीत बिबटे, वानर, तरस, हरीण, माकड, गिधाड यांसारख्या वन्यजिवांचा वावर अधिक आहे. हद्दीतून राष्टÑीय व राज्य महामार्ग, रेल्वेमार्ग जात असल्यामुळे अनेकदा अपघातात वन्यजीव मृत्युमुखी पडतात, जखमी होतात. अशावेळी या वन्यजिवांच्या जखमांचा दाह थांबविताना औषधोपचार करणेदेखील मोठे ‘दिव्य’ ठरते. कारण वनविभागाकडे त्या पद्धतीची रचना असलेला विशिष्ट ‘औषधोपचार पिंजरा’च उपलब्ध नाही. अद्ययावत सामुग्रीची उणीवबिबट्यासारख्या वन्यजिवाला भुलीचे औषध देण्यासाठी वापरली जाणारी नाशिक परिक्षेत्राची ‘ट्रॅन्क्युलाइज गन’देखील नादुरुस्त झाली आहे. तसेच पश्चिम वनविभागातील आठ वनपरिक्षेत्र आणि त्यांचे मिळून ३५ ते ३८ वनपरिमंडळ आहेत. एवढे मोठे क्षेत्र असताना केवळ नाशिक, सिन्नर या दोन परिक्षेत्रांकडेच स्वतंत्र ‘ट्रॅन्क्युलाइज गन’ आहे. गस्तीसाठी वाहनेही अपुरी आहेत. प्रत्येक परिक्षेत्राकरिता केवळ एक गस्तीवाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे कर्मचाºयांना गस्त करताना तारेवरची कसरत करावी लागते.

Web Title: Asthma due to insufficient equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.