‘अॅस्ट्रो ओपीडी’ निव्वळ मुर्खपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:49 AM2017-08-07T00:49:30+5:302017-08-07T00:50:18+5:30
सरकारी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात ‘अॅस्ट्रो ओपीडी’ सुरू करण्याचा मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेतलेला निर्णय मुर्खपणाचा आहे. या घातक निर्णयामुळे परिवर्तनाची चाके उलटी फिरणार असल्याची टीका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे यांनी केली.
नाशिक : सरकारी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात ‘अॅस्ट्रो ओपीडी’ सुरू करण्याचा मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेतलेला निर्णय मुर्खपणाचा आहे. या घातक निर्णयामुळे परिवर्तनाची चाके उलटी फिरणार असल्याची टीका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे यांनी केली.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटन वाढीसाठी नाशिकमध्ये आलेले आवारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा सरकारकडून विज्ञानाची होणारी गळचेपी यावर जोरदार टीका केली. यावेळी आवारे म्हणाले, महाराष्टÑ एकमेव राज्य आहे की या राज्यात जादूटोणाविरोधी कायदा संमत करण्यात आला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समितीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. राज्यस्तरावर या कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी समितीने धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. मध्य प्रदेश सरकारकडून सरकारी रुग्णालयात ज्योतिषी सल्ला देण्याचा घेण्यात आलेला निर्णय एकप्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोणावर घाला घालणारा आहे. या निर्णयामुळे विज्ञानाची गळचेपी अधिक वाढणार आहे. ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेत, असा हा निर्णय मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेऊन लोकांना दैववादी बनविण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे.