प्लॅस्टिकमुक्तीसाठी जनजागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:56 PM2018-01-22T23:56:15+5:302018-01-23T00:21:45+5:30
सध्याच्या काळात प्लॅस्टिकचा वापर प्रचंड वाढला असून, त्यामुळे होणाºया प्रदूषणाला सर्वांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न निफाड येथील वैनतेय विद्यालयाने हाती घेऊन शुक्रवारच्या बाजारात प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, असे दुकानदारांना आवाहन करीत जनजागरण केले.न्यायमूर्ती रानडे महोत्सवांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
निफाड : सध्याच्या काळात प्लॅस्टिकचा वापर प्रचंड वाढला असून, त्यामुळे होणाºया प्रदूषणाला सर्वांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न निफाड येथील वैनतेय विद्यालयाने हाती घेऊन शुक्रवारच्या बाजारात प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, असे दुकानदारांना आवाहन करीत जनजागरण केले.न्यायमूर्ती रानडे महोत्सवांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी, प्राचार्य मालती वाघवकर यांना वैनतेय विद्यालयात कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांकडून कापडी पिशव्या बनवा आणि या बनवलेल्या पिशव्यांचे विद्यार्थ्यांकडून वाटप करून त्यांना त्या वापरण्यासाठी प्रवृत्त करा. शिवाय आठवडे बाजारात दुकानदारांनासुद्धा या कापडी पिशव्या भेट देऊन प्लॅस्टिक पिशव्या न वापरण्यासाठी विनंती करा, अशी सूचना केली. जगताप यांची ही विनंती त्यांनी तत्काळ मान्य केली व हा उपक्रम राबविण्यासाठी कार्यवाही केली. वाघवकर यांनी कार्यानुभव या विषयांतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या बनवून आणण्यासाठी सांगितले. उपप्राचार्य रेखा चौधरी, पर्यवेक्षक डी. बी. वाघ, पर्यवेक्षक तानाजी दराडे यांनी व कार्यानुभव शिक्षकांनी हा उपक्र म विद्यार्थ्यांकडून राबविला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत जवळजवळ दोन हजार कापडी पिशव्या बनवून आणल्या. विद्यालयाने या पिशव्या घेऊन आठवडे बाजारात या प्रश्नावर जनजागरण करत प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका या अभियानास प्रारंभ झाला. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, वि. दा. व्यवहारे यांची भाषणे झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी रॅली काढली. या रॅलीत ‘प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, प्लॅस्टिकचे प्रदूषण थांबवा, माणसा..माणसा.. एकच कर प्लॅस्टिक पिशव्यांना देऊ नको घर, माणसा.. माणसा.. एकच विनंती, प्लॅस्टिक पिशव्यांना देऊ नको पसंती, कचºयाच्या ढिगाºयात दडलंय काय, प्लॅस्टिकशिवाय दुसरं काय’ यांसह अनेक घोषणा लिहिलेले फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते. विद्यार्थ्यांनी या घोषणा देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमास न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड, विश्वस्त आप्पासाहेब उगावकर, वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले, प्रभाकर कुयटे, राजेंद्र राठी, किरण कापसे, दिलीप वाघवकर, राजेश सोनी, मधुकर राऊत उपस्थित होते.