सध्या शेतकऱ्यांचा पाठीराखा कोणीच नाही : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 02:18 PM2022-11-06T14:18:44+5:302022-11-06T14:21:05+5:30

आधीचे सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नव्हते आणि सध्याचे सरकार देखील नाही यामुळे शेतकऱ्यांना डाव्या हाताने मारायचे की उजव्या हाताने मारायचे असा प्रश्न सध्या पडला आहे.

At present there is no one to support the farmers says Raju Shetty | सध्या शेतकऱ्यांचा पाठीराखा कोणीच नाही : राजू शेट्टी

सध्या शेतकऱ्यांचा पाठीराखा कोणीच नाही : राजू शेट्टी

googlenewsNext

 अशोक बिदरी 

मनमाड ( नाशिक ) : आधीचे सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नव्हते आणि सध्याचे सरकार देखील नाही यामुळे शेतकऱ्यांना डाव्या हाताने मारायचे की उजव्या हाताने मारायचे असा प्रश्न सध्या पडला आहे, असा हल्लाबोल आज स्वाभीमानीचे राजू शेट्टी यांनी केला. 

निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले. यामुळे पावसाची अनिश्चितता आहे. कमी वेळ त जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढल्याने ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होते.यामुळे बळीराजा संकटात सापडतो. एनडीआरएफचा निकष देखील बदलावे लागणार आहेत, असंही राजू शेट्टी म्हणाले. 

यंदा सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ओला दुष्काळ परिस्थिती असताना सध्याचे सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नसल्याचे खंत व्यक्त करत विरोधी पक्ष गप्प असून विरोधी पक्षातले नेते नोटिसामुळे भेदरलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पाठीराखा नसल्याची टीका देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मनमाड येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
 

Web Title: At present there is no one to support the farmers says Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.