आतासुळा डोंगराकडे गौण खनिज माफियांची वक्रदृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:11 AM2021-06-01T04:11:17+5:302021-06-01T04:11:17+5:30
नाशिक व दिंडोरी या दोन तालुक्यांच्या सीमा सुळा डोंगर करीत असल्याने दिंडोरी आणि नाशिक हद्दीचा फायदा घेत ...
नाशिक व दिंडोरी या दोन तालुक्यांच्या सीमा सुळा डोंगर करीत असल्याने दिंडोरी आणि नाशिक हद्दीचा फायदा घेत दिंडोरी हद्दीतील खडी क्रेशर चालकाने मातोरीच्या बाजूने मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरला आहे. डोंगराच्या पायथ्याला संजीवनी पाझर तलाव असून त्यांची लांबी सुमारे दोन किलोमीटर आहे. या डोंगरावरील माती पावसाळ्यात तलावात जमा होऊन त्याचे अस्तित्व धोक्यात येण्याची मोठी भीती व्यक्त होत आहे. या तलावातील जलसाठ्यावर एकूण आठशे एकर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यामुळे भविष्यात तलाव देखील मातीने बुजला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
------
सुळा डोंगर हा चामरलेणी सारखा महत्त्वाचा असून, त्यावर हजारो वर्षांची नैसर्गिक संपत्ती आहे, परंतु शासनाच्या बेजबाबदारपणामुळे ही संपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासकीय यंत्रणेने त्वरित त्याकडे लक्ष देऊन डोंगर वाचवावा.
-वाळू काकड, सामाजिक कार्यकर्ते
===========
डोंगराच्या खोदाईबाबत ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती नाही. खडी क्रेशर कंपनी मातोरीची नाही. त्यामुळे हे काम बंद करून सुळा डोंगर वाचला गेला पाहिजे आणि संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई झाली पाहिजे.
-दीपक हगवणे, सरपंच
--------
डोंगरातून मुरुम काढण्याबाबत संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घेतली होती. पण परवानगीपेक्षा जास्त खोदाई झाली असल्याचे कळते. याबाबत सविस्तर माहिती तलाठी यांच्याकडून मागवली आहे.
- राहुल काळे, मंडळ अधिकारी
------ (फोटो ३१ सुळा, टेकडी)