शंभर पसेंटाईलसह अथर्व तांबट देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:14 AM2021-03-28T04:14:30+5:302021-03-28T04:14:30+5:30

सातपूर :- अभियांत्रिकी प्रवेशासाठी दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या जेईई मार्च २०२१ मुख्य परीक्षेत सातपुरच्या अथर्व ...

Atharva copper tops the country with a hundred percentiles | शंभर पसेंटाईलसह अथर्व तांबट देशात अव्वल

शंभर पसेंटाईलसह अथर्व तांबट देशात अव्वल

Next

सातपूर :- अभियांत्रिकी प्रवेशासाठी दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या जेईई मार्च २०२१ मुख्य परीक्षेत सातपुरच्या अथर्व अभिजित तांबट या विद्यार्थ्याने शंभर पर्सेटाईल गुणवत्तेसह राष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. देशभरातील सुमारे १३ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेटाईल गुण मुळविले असून महाराष्ट्रातून सातपूर येथील अथर्व तांबट व गार्गी बक्षी यांनी अव्वल स्थान पटकावले आहे.

अथर्व सातपूरच्या अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीतील अभिजित तांबट या मुलगा आहे. सध्या अभिजित तांबट मुबंईत नोकरीसाठी राहत असून अथर्वही नवी मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयातून शिक्षण घेत आहे. त्याने मुबईत राहूनच जेईई मेन परीक्षेची तयारी करून राष्ट्रीय क्रमवारीत शंभर पर्सेटाईल मिळवीत अव्वल क्रमांक पटकावला असून यापुढे आयआयटी मुंबईमध्ये कॉम्प्युटर विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचे ध्येय त्याने समोर ठेवले आहे. जेईई मेनचा पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यात झाल्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १६ ते दि.१८ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेत तीनशे पैकी तीनशे गुणांसह शंभर पर्सेंटाईल मिळवित अथर्वने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

===Photopath===

270321\27nsk_42_27032021_13.jpg

===Caption===

अथर्व तांबट

Web Title: Atharva copper tops the country with a hundred percentiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.