‘एटीएम’मध्ये नागरिकाला ८० हजारांना गंडा
By admin | Published: March 20, 2017 02:27 PM2017-03-20T14:27:48+5:302017-03-20T14:27:48+5:30
संशयिताने त्याच्याकडील बनावट एटीएम कार्ड देऊन त्याच्याकडील कार्डाद्वारे बॅँक खात्यातून परस्पर ८० हजाराची रक्कम काढून फ सवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नाशिक : येथील द्वारका परिसरातील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका इसमाला संशयिताने त्याच्याकडील बनावट एटीएम कार्ड देऊन त्याच्याकडील कार्डाद्वारे बॅँक खात्यातून परस्पर ८० हजाराची रक्कम काढून फ सवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र एकनाथ गांगुर्डे (४१, रा. अशोका मार्ग) हे एटीएममध्ये खात्यावरील रक्कम तपासून घेण्यासाठी गेले. त्यांनी एका मशीनमध्ये एटीएम कार्ड स्वॅप केले. याचवेळी संशयित दुसऱ्या ग्राहक दुसऱ्या मशिनवर आर्थिक व्यवहार करत होता. या संशयिताने गांगुर्डे यांना मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड जवळ घेऊन त्यांना बनावट एटीएम कार्ड सोपविले. दरम्यान, संशयिताने त्यांच्या कार्डाचा वापर करून ८० हजार रुपये परस्पर लंबविले. सदर प्रकार गांगुर्डे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलिसांनी एटीएमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले असून या आधारे अज्ञात संशयित भामट्याचा पोलीस शोध घेत आहे.