एटीएम, बँकांच्या बाहेर रांगा

By Admin | Published: November 12, 2016 02:27 AM2016-11-12T02:27:02+5:302016-11-12T02:26:06+5:30

नोटा बदलण्याची घाई : पोस्टातही ग्राहकांची वाढली गर्दी

ATM, Range outside banks | एटीएम, बँकांच्या बाहेर रांगा

एटीएम, बँकांच्या बाहेर रांगा

googlenewsNext

नाशिक : केंद्र सरकारने घेतलेल्या १००० व ५०० रुपयांच्या जुन्या नोटांवरील बंदीच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये पसरलेली अस्वस्थता अद्यापही कायम असून शहरातील विविध बँका, पोस्ट आॅफिस, सीडीएम आणि एटीएम मशीनसमोर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी व दैनंदिन खर्चासाठी रक्कम काढण्यासाठी शुक्रवारीही लांबच लांब रांगा लावल्याचे पाहायला मिळाले.
नागरिकांना जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी शहरातील अनेक सीडीएम सेंटर कार्यान्वित करण्यात आली आहेत. सीडीएम मशीनमध्ये एकाच वेळी ४८ हजार रुपयांपर्यंतची रक्कम जमा करता येत असल्याने नागरिकांनी बँकांसह अशा सीडीएम मशीनसमोरही रांगा लावून हजार व पाचशेच्या नोटांचा भरणा केला. तर काही ठिकाणी एटीएममधून ग्राहकांना पैसे मिळाले असले तरी विविध भागातील सरकारी बँक ांच्या एटीएमसह बहुतेक एटीएम शुक्रवारीही बंद राहिले. अनेकांनी बँकांमध्ये, पोस्टात तासन्तास उभे राहून ४००० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेच्या नोटा बदलून घेतल्या. चलनातील मोठ्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर गुरुवारी बँका उघडल्यानंतर सहकारी आणि खासगी क्षेत्रातील काही बँकांकडून दुपारच्या आत १०, २०, ५०, १०० च्या नोटा संपल्याचे सांगण्यात आले. तर काही बँकांमध्ये ओळखीच्या आणि कर्मचाऱ्यांच्या नातेसंबंधातील व्यक्तींना प्राधान्याने नोटा बदलून देण्याचे प्रकार घडल्याने शुक्रवारी सकाळपासूनच नागरिकांनी सरकारी बँका आणि पोस्ट आॅफिसमध्ये गर्दी केली. सरकारने अचानक हजार व पाचशे रुपयांच्या मोठ्या जुन्या चलनी नोटा रद्द केल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नवीन मोठ्या नोटांपेक्षा १०, २०, ५०, १००च्या नोटांविषयी विश्वासार्हता वाढली असून, या नोटांना मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपवाद वगळता १०, २०, ५०, १०० च्या नोटांचा भरणा होत नसल्याचे चित्र असल्याने बँकांमध्येही १०, २०, ५०, १०० च्या चलनी नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. बँकामध्ये येणारे चलन जलदगतीने संपत असून पर्याप्त स्वरूपात नवीन चलनी नोटांचा पुरवठा वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: ATM, Range outside banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.