गुरुदत्त नगरमधील किराणा दुकानसह एटीएम सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 08:20 PM2020-07-17T20:20:53+5:302020-07-18T00:45:29+5:30
सिन्नर : शहरातील सरदवाडी रोडवरील गुरुदत्त नगरमध्ये कोरोना बाधित आढळल्यानंतर रुग्णाचे घर केंद्र मानून परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषीत करण्यात येते. या नियमाला धरुन गुरुदत्तनगरमधील कानिफनाथ किराणा दुकान नगर परिषदेकडून पुढील आदेश येईपर्यंत सिल करण्यात आले आहे.
सिन्नर : शहरातील सरदवाडी रोडवरील गुरुदत्त नगरमध्ये कोरोना बाधित आढळल्यानंतर रुग्णाचे घर केंद्र मानून परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषीत करण्यात येते. या नियमाला धरुन गुरुदत्तनगरमधील कानिफनाथ किराणा दुकान नगर परिषदेकडून पुढील आदेश येईपर्यंत सिल करण्यात आले आहे. या दुकानाशेजारी असणारे ए.टी.एम केंद्रही बंद ठेवण्याचा आदेश प्रतिबंधीत क्षेत्राचे अधिकारी अर्जुन भोळे यांनी दिला आहे.
कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला असून त्यात अनेक तरतूदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार असा रुग्ण आढळल्यास रुग्णाचे घर केंद्रबिंदू घोषीत करून त्यापासून ५० मीटरचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र व एक किमीचा परिसर बफरझोन घोषीत करण्यात येतो.
गुरुदत्तनगरमध्ये रुग्ण आढळल्यानंतरही कानिफनाथ किराणा दुकान सुरु होते. त्यामुळे परिसरात विनाकारण गर्दी केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने ही गर्दी टाळण्यासाठी कानिफनाथ किराणा दुकान १३ जुलैपासून पुढील आदेश येईपर्यंत सिल करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. याच ठिकाणी असलेले ए. टी. एम. उघडू नये अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अंतर्गत पुढील कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा या आदेशात देण्यात आला आहे.