आत्मा मालिक सत्संग समितीतर्फे कोजागरी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 01:41 AM2019-10-13T01:41:03+5:302019-10-13T01:41:41+5:30

आत्मा मालिक सत्संग समिती आणि आत्मा मालिक ध्यानपीठ नाशिक यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त शनिवारी (दि.१२) औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी लॉन्स येथे आत्मा मालिक कोजागरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

Atma cheers by Atma Malik Satsang Samiti | आत्मा मालिक सत्संग समितीतर्फे कोजागरी उत्साहात

आत्मा मालिक सत्संग समितीतर्फे आयोजित कोजागरी पौर्णिमा उत्सवास उपस्थित जंगलीदास महाराज, परमानंद महाराज, नीजानंद महाराज व गणेश महाराज.

googlenewsNext

पंचवटी : आत्मा मालिक सत्संग समिती आणि आत्मा मालिक ध्यानपीठ नाशिक यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त शनिवारी (दि.१२) औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी लॉन्स येथे आत्मा मालिक कोजागरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आत्मा मालिक सत्संग समितीच्या वतीने या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी संत दर्शन तसेच प्रवचनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
शनिवारी परम पूज्य सद्गुरू जंगलीदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कोजागरी पौर्णिमा उत्सव कार्यक्र मात आत्मतत्त्व, आत्मज्ञान, मोक्षप्राप्ती आत्मानुभव, ध्यानयोग, अभ्यासाची परिभाषा, आहार नियमन, आत्मशांती व मोक्षप्राप्ती सहज व सोपा मार्ग याची माहिती शिबिरात उपस्थित भाविकांना देण्यात आली. या कोजागरी पौर्णिमा उत्सवात योग प्राणायाम, मौन, ध्यान, भजन, प्रवचन यांसह प्रबोधन आदी विविध कार्यक्र म संपन्न झाले.
संपूर्ण दिवसभर चाललेल्या कोजागरी पौर्णिमा उत्सवात उपस्थित संत-महंतांचे प्रवचन झाले. या अमृत श्रवण, संतदर्शन व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. रात्री चौदस कार्यक्र म निमित्ताने नाम दीक्षेचा (गुरूमंत्र) कार्यक्र म झाला. कार्यक्र माला आत्मा मालिक ध्यान पीठाचे संत परमानंद महाराज, निजानंद महाराज, गणेश महाराज, अन्य आश्रम निवासी संत आश्रमाचे सर्व विश्वस्त, नाशिक निवासी संत व भाविक उपस्थित होते. यावेळी प्रवचन कार्यक्र मानंतर उपस्थित भाविकांना कोजागरी पौर्णिमेनिमित्त महाप्रसाद वाटप करण्यात आला.

Web Title: Atma cheers by Atma Malik Satsang Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.