आत्मा मालिक इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांची विभागस्तरावर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 09:42 PM2019-10-05T21:42:54+5:302019-10-05T21:44:35+5:30
जळगाव नेऊर : शालेय जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरु कुल पुरणगाव येथील विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. योगासन स्पर्धेत १४, १७ व १९ वर्ष मुले व मुली वयोगटातील ग्रामीण मधुन जिल्ह्यात आत्मा मालिक गुरूकुलाच्या १६ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेत निवड झाली.

१४ वर्षा आतील (मुले व मुली) सांघिक प्रकारात, जीवन पाडवी (प्रथम), योगेश भोडवे (तृतीय), यश जाधव (चतुर्थ), मोहित गवळी (पाचवा).
रिदमिक योग प्रकारात मध्ये मोहित गवळी (प्रथम), अरस्टीक योगामध्ये योगेश भोडवे, मुलींमध्ये कांचन पाडवी सांघिक व रिदमिकमध्ये (प्रथम), १७ वर्षाआतील मुले व मुली रेदमिक योगा प्रकारात रितेश जाधव (प्रथम ), स्नेहा जाधव सांघिक व रिदमिक, १९ वर्षाआतील मुले व मुली अनिकेत जाधव (प्रथम), जय मुटेकर (द्वितीय), अभिषेक गायकवाड (तृतीय), रिदमिक योग अनिकेत जाधव (प्रथम), रिदमिक योगमध्ये जय मुटेकर यांनी घवघवीत यश संपादन केले.
यशस्वी खेळाडूंना योगा प्रशिक्षक प्रविण घोगरे, अध्यक्ष हनुमंत भोंगळे ज्ञानपीठाचे संत सेवादास महाराज, उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे, प्राचार्य राजेश पाटील, योगेश सोनवणे, प्रकाश भामरे, प्रमोद शेलार, तेजस राऊत, योगेश गांगुर्डे , ऋ तिक भाबड यांचे मार्गदर्शन लाभले.