मखमलाबादला भक्तिगीतांनी जागविले वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:02 AM2018-11-11T01:02:34+5:302018-11-11T01:02:53+5:30
मखमलाबाद येथील पाडवा पहाट स्वरसम्राट सारंग गोसावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मधुर स्वरांनी मंगलमय झाली. जय जय राम कृष्ण हरी, कानडा राजा पंढरीचा, देह देवाचे मंदिर यासह एकापेक्षा एक सरस भक्ती आणि भावगीते सादर करून या गायकांनी वातावरण जागविले.
नाशिक : मखमलाबाद येथील पाडवा पहाट स्वरसम्राट सारंग गोसावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मधुर स्वरांनी मंगलमय झाली. जय जय राम कृष्ण हरी, कानडा राजा पंढरीचा, देह देवाचे मंदिर यासह एकापेक्षा एक सरस भक्ती आणि भावगीते सादर करून या गायकांनी वातावरण जागविले. आर्ट आॅफ लिव्हिंग परिवारातर्फेशांतीनगरमधील नाना -नानी पार्कमध्ये हा कार्यक्रम पार पडला. आमदार बाळासाहेब सानप यांनी स्वागत केले. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, सौ. दराडे, पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, माजी महापौर अशोक मुर्तडक, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता विजय हाके, दामोदर मानकर, नारायण काकड, ज्येष्ठ नगरसेवक भिकूबाई बागुल, सुनीता पिंगळे, पुंडलिक खोडे, प्रियांका माने उपस्थित होते. ‘तुझं मागतो मी आता, विठ्ठला तू वेडा कुंभार, निजरूप दाखव, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे दिसले यासह अनेक भक्ती आणि भावगीतांना उपस्थितांनी चांगली दाद दिली.