पोलिसांच्या ‘घरात’ जाऊन फोडले एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:58 AM2019-05-12T00:58:37+5:302019-05-12T00:59:01+5:30

ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस वसाहतीमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बॅँकेचे एटीएम कक्षात जाऊन अज्ञात चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह एटीएम यंत्राची तोडफोड केली. यंत्रामध्ये असलेला रोकडचा ‘ट्रे’ काढता न आल्यामुळे रक्कम चोरी होऊ शकली नाही,

 ATMs in police's house | पोलिसांच्या ‘घरात’ जाऊन फोडले एटीएम

पोलिसांच्या ‘घरात’ जाऊन फोडले एटीएम

Next

पंचवटी : ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस वसाहतीमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बॅँकेचे एटीएम कक्षात जाऊन अज्ञात चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह एटीएम यंत्राची तोडफोड केली. यंत्रामध्ये असलेला रोकडचा ‘ट्रे’ काढता न आल्यामुळे रक्कम चोरी होऊ शकली नाही, मात्र पोलिसांच्या वसाहतीत जाऊन चक्क एटीएम फोडण्याचे धाडस करणाºया या चोरट्याने पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.
आडगाव शिवारातील ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या पोलिसांच्या वसाहतीमध्ये प्रवेश करून बॅँकेच्या एटीएमवर डल्ला मारण्याचा चोरट्याचा डाव अगदी थोड्यावरून हुकला अन्यथा एटीएममधील रोकड लुटून नेण्यास चोरटा यशस्वी ठरला असता. हा चोरटा तिसºया डोळ्यात कैद झाला असला तरी त्याच्या चेहºयावर मास्क असल्यामुळे पोलीस त्याचा कितपत माग काढण्यास यशस्वी ठरतात, हे लवकरच दिसून येईल. कारण आडगाव पोलिसांना गोळीबारातील फरार संशयितांचा अद्याप मागमूस लागू शकलेला नाही. तसेच पोलीस आयुक्तालयाच्या चाचणी परीक्षेतही हे पोलीस ठाणे अखेरच्या क्रमांकावर घसरले असून, कायदा सुव्यवस्थेत त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे आडगाव पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांकडे या घटनेबाबत बँकेचे कर्मचारी मुकुंद रमेश नंदरवाल यांनी  तक्र ार दिली आहे.
दोन सीसीटीव्ही फोडले
एटीएम केंद्राच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले दोन सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्याने फोडून प्रवेश केला. एटीएम यंत्र संपूर्णत: उद्ध्वस्त केले, मात्र चोरट्याला रोकड असलेली पेटी वजा ट्रे काढता येऊ न शकल्यामुळे रोकड सुरक्षित राहिली अन्यथा चोरट्याचा डाव यशस्वी ठरला असता. चोरट्याने सीसीटीव्हीचे नुकसान जरी केले तरी दुसºया कॅमेºयात त्याचा प्रताप कैद झाला आहे. त्याने चेहरा झाकल्यामुळे या फुटेजचा कितपत फायदा होईल.

Web Title:  ATMs in police's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.