खेरवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 10:47 PM2022-05-18T22:47:15+5:302022-05-18T22:47:42+5:30
सायखेडा : खेरवाडी, ता. निफाड येथील तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी तीन महिन्यांपूर्वी अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याबाबत सायखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवण्यात आली असून दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे.

खेरवाडी येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील समाधान संगमनेरे (२५) व संतोष बेंडकुळे यांनी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने सदर घटना कुटूंबियांना सांगितली. सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासासाठी दोन पथके तयार करून संशयित समाधान संगमनेरे यास खेरवाडी शिवारातून आणि संतोष बेंडकुळे यास दिंडोरी येथून अटक केली आहे. दोघांना रविवार (दि.२२) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कादरी हे करीत आहेत. संशयितांच्या विरोधात सायखेडा पोलीस स्टेशनला भादंवि ३७६, ४४२, ५०६, ३४ तसेच लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण कायदाअंतर्गत कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.