तरुणीवर अत्याचार; पाच जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:16 AM2021-02-09T04:16:50+5:302021-02-09T04:16:50+5:30

संगमेश्वरातील पवननगर येथे १५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०२० दरम्यान ही घटना घडली. पीडित तरुणीने आई-वडिलांना हकीगत सांगून शनिवारी ...

Atrocities on young women; Crimes against five people | तरुणीवर अत्याचार; पाच जणांविरुद्ध गुन्हा

तरुणीवर अत्याचार; पाच जणांविरुद्ध गुन्हा

Next

संगमेश्वरातील पवननगर येथे १५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०२० दरम्यान ही घटना घडली. पीडित तरुणीने आई-वडिलांना हकीगत सांगून शनिवारी (दि.६ ) याबाबत पोलिसात फिर्याद दिली. सुमित बाळूसिंग परदेशी (२५) रा. पवननगर, पवन परदेशी, शोभा परदेशी, विकी भावसार, राजू शिंदे सर्व रा. मालेगाव यांचे विरोधात फिर्याद देण्यात आली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, सुमित परदेशी याने फिर्यादीशी फोनवर संपर्क साधून विकी भावसार व राजू शिंदे यांच्या सहकार्याने फिर्यादीस फोनवर झालेले व्हॉट्सॲप संदेश तुझ्या नातेवाइकांना दाखवून तुझी बदनामी करेल, असे धमकावून तिच्याशी लग्न केले. तिला स्वत:च्या घरात डांबून ठेवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादीने आईच्या घरी जाण्याबाबत सांगितले असता सुमित, पवन व शोभा परदेशी यांनी शिवीगाळ व मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

Web Title: Atrocities on young women; Crimes against five people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.