नाशिकच्या वडाळा पाथर्डी रस्त्यावरील दुभाजकांवर जाहिरातफलकांचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:49 PM2018-02-23T12:49:46+5:302018-02-23T12:58:25+5:30
कापडी, लोखंडी फलकांमुळे वाहतुकीस अडथळा
नाशिक- वडाळा पाथर्डी रस्त्यावरील दुभाजकांवर जागोजागी व्यावसायिकांच्या जाहिरात फलकांचे जाळे पसरलेले दिसत असून त्यामुळे रस्त्याची विद्रुपीकरण होत चालल्याने स्मार्ट सिटी होण्यास खोडा निर्माण होत आहे. या कापडी, लोखंडी फलकांमुळे वाहतुकीस अडथळा होत असून छोटे मोठे अपघातही होत आहेत. हे फलक तातडीने काढून घ्यावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वडाळा नाका ते पाथर्डी गाव चौफुली हा वडाळा पाथर्डी रस्ता दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आला. दहा वर्षांपूर्वी वडाळा नाका ते राजसारथी सोसायटी या दरम्यान नागपूरच्या धर्तीवर रस्त्याचे रु ंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले तसेच रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात येऊन पादचाºयांसाठी दुतर्फा पदपथही तयार करण्यात आले.परंतु वडाळा नाका ते पाथर्डी गाव या वडाळा पाथर्डी रस्त्यादरम्यान असलेल्या दुभाजकावर काही व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे लोखंडी व कापडी फलक ठेवले आहे. त्यामुळे दुभाजक जाहिरात फलकासाठी की वाहनांच्या नियंत्रणासाठी आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.या रस्त्यादरम्यान विनय नगर साईनाथ नगर इंदिरानगर सार्थक नगर कलानगर पांडवनगरी यासह विविध उपनगरे असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. या जाहिरात फलकांनी वाहतुकीस अडथळा होत आहे. कलानगर ते पाथर्डीगाव या दरम्यान रस्त्याचे काम झाले नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे. याची दखल घेत सुमारे पाच वर्षांपूर्वी कलानगर ते पाथर्डीगाव रस्त्याचे रूंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. तसेच समोरासमोर वाहनांचे अपघात होऊ नये म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजकही टाकण्यात आले पादचाºयांसाठी दुतर्फा पदपथही तयार करण्यात आले आहे.