बिबट्याने केला वासरावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 10:38 PM2019-11-03T22:38:11+5:302019-11-03T22:39:34+5:30

आहुर्ली : सांजेगाव ता. इगतपुरी येथे वनविभागाने सापळा लावून एक बिबट्या जेरबंद करण्याच्या घटनेस अद्याप महिनाही उलटला नसुन पुन्हा एकदा बिबट्याची दहशत सुरू झाली आहे.

Attack on the calf with a nibble | बिबट्याने केला वासरावर हल्ला

सांजेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले वासरु.

Next
ठळक मुद्देआहुर्ली : सांजेगाव येथे पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण

आहुर्ली : सांजेगाव ता. इगतपुरी येथे वनविभागाने सापळा लावून एक बिबट्या जेरबंद करण्याच्या घटनेस अद्याप महिनाही उलटला नसुन पुन्हा एकदा बिबट्याची दहशत सुरू झाली आहे.
सांजेगावातील बाळु काळे या शेतकऱ्यांच्या वासरावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. सुदैवाने वासराच्या ओरडण्यानेडीने काळे कुटुंबातील लोक झटपट जागे झाल्यावर तातडीने त्यांनी हल्ला गुल्ला केला. यामुळे बिबट्या तेथून पसार झाला.
विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी वनविभागाने सापळा लावून पकडलेला बिबट्या बाळु काळे याच शेतकऱ्यांच्या घराजवळ जेरबंद करण्यात आला होता.
दरम्यान या मुळे पुन्हा एकदा परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने याची तातडीने दखल घेवुन बंदोबस्त करावा अशी मागणी सांजेगाव व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Attack on the calf with a nibble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.