स्वस्त धान्य दुकानदारावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:35 AM2020-04-20T00:35:18+5:302020-04-20T00:35:36+5:30

पेगलवाडी येथे शिधापत्रिकेवर मिळणारा तांदूळ, गहू व मोफत मिळणारा तांदूळ दिला नाही म्हणून शिधापत्रिका घेऊन धान्य घेण्यास आलेला सनी मेढे या संशयिताने स्वस्त धान्य दुकानदार नामदेव झोले व इतरांना मारहाण केली. मेढेविरुद्ध त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Attack on a cheap grain shopkeeper | स्वस्त धान्य दुकानदारावर हल्ला

स्वस्त धान्य दुकानदारावर हल्ला

Next
ठळक मुद्देपेगलवाडी येथील घटना : त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पेगलवाडी येथे शिधापत्रिकेवर मिळणारा तांदूळ, गहू व मोफत मिळणारा तांदूळ दिला नाही म्हणून शिधापत्रिका घेऊन धान्य घेण्यास आलेला सनी मेढे या संशयिताने स्वस्त धान्य दुकानदार नामदेव झोले व इतरांना मारहाण केली. मेढेविरुद्ध त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (दि.१८) सकाळी
बिहरु कोठुळे यांचे कार्ड घेऊन त्यांचा भाऊ कारभारी कोठुळे आले असताना कार्ड पाहून या कार्डवर अद्याप धान्य मंजूर नसल्याने रेशन मिळणार नाही, असे दुकानदार झोले यांनी सांगितले व धान्य देण्यास नकार दिला होते. याचा जाब विचारण्यासाठी मेढे आला होता.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ज्या शिधापत्रिकांवर आधारकार्ड निगडित जेवढे लाभार्थी असतील त्याची नोंदणी होऊन १२ अंकी नंबर टाकला जातो. त्यानंतर प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी हा शिक्का मारला जातो. त्यानंतर धान्य वितरित करता येते. त्यातही त्यांच्या नियमात बसेल तरच धान्य वाटप करता येते. अन्यथा शेवटपर्यंत केशरी कार्ड असून धान्य मिळत नाही. काही शिधापत्रिकांवर तर शिक्का असूनही धान्य मिळणार नाही, असे सांगण्यात आले. आणि ही बाबच वादाचा विषय बनत आहे. त्यात शासनाचे वेगवेगळे आदेश शिधापत्रिकाधारकांची संभ्रमावस्था वाढवित आहे.
१२ अंकी नंबर नसलेले कार्ड घेऊन आल्याने दुकानदाराने धान्य देण्यास नकार दिला. याबाबत जाब विचारण्यासाठी सनी मेढे आला. त्यावरून वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नामदेव किसन झोले याने फिर्याद दाखल केली आहे. संशयित सनी मेढे यास पोलिसांनी अद्याप ताब्यात घेतले नाही. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी भादंवि ३२४, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भाबड करीत आहेत.

Web Title: Attack on a cheap grain shopkeeper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.