चवताळलेल्या बिबट्याकडून पुन्हा मुलावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 10:44 PM2021-10-19T22:44:45+5:302021-10-19T22:46:15+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यात बिबट्याने दहशत माजवली असून काळुस्ते परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सोमवारी सायंकाळच्या सुमारास काळुस्ते दरेवाडी येथील मुलाला बिबट्याने हल्ला करून ठार मारले. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तर याच परिसरात मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास काळुस्ते येथील सहा वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घातली यात मुलगा जखमी झाला असून त्यास तात्काळ उपचारासाठी रवाना केले आहे.

शेळी चारण्यासाठी गेलेल्या बालकावर सोमवारी (दि.१८) बिबट्याच्या हल्ल्यात दीपक गावंडा (११) हा मुलगा ठार झाला होता. त्यामुळे वनविभाग या घटनेतील बिबट्यास जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील असतानाच पुन्हा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास काळुस्ते येथील कार्तिक घारे नामक या सहा वर्षीय मुलालाही बिबट्याने जखमी केले आहे.
ही घटना घडताच घोटी ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेतून या बालकाला तात्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.