हिरे समर्थक खैरनार बंधूंवर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 06:56 PM2017-12-19T18:56:46+5:302017-12-19T18:56:59+5:30
मालेगाव : येथील पंचायत समितीचे भाजपाचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व भाजपा नेते अद्वय हिरे यांचे समर्थक गणेश खैरनार व त्यांचे लहान बंधू प्रसाद खैरनार यांची वाहने सिनेस्टाईलने अडवून लाकडी बॅट, दांडा व काठ्यांनी वाहनांची तोडफोड करीत खैरनार बंधू व त्यांच्या दोघा मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे, राहूल गायकवाड, विकी चव्हाण या तिघांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगाव : येथील पंचायत समितीचे भाजपाचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व भाजपा नेते अद्वय हिरे यांचे समर्थक गणेश खैरनार व त्यांचे लहान बंधू प्रसाद खैरनार यांची वाहने सिनेस्टाईलने अडवून लाकडी बॅट, दांडा व काठ्यांनी वाहनांची तोडफोड करीत खैरनार बंधू व त्यांच्या दोघा मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे, राहूल गायकवाड, विकी चव्हाण या तिघांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या पं. स. सदस्य खैरनार यांच्यावर धुळे येथील जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, पंचायत समितीचे भाजपाचे सदस्य गणेश खैरनार व प्रसाद खैरनार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ व या मारहाण प्रकरणातील संशयित अविष्कार भुसे, राहूल गायकवाड, विकी चव्हाण यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर भाजपा पदाधिकारी व हिरे समर्थकांनी मुकमोर्चा काढला होता. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. मोर्चाला हिरे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून प्रारंभ झाला. मोर्चा कॉलेजरोड मार्गे प्रांत कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी मोर्चेकºयांनी हातात निषेधाचे फलक घेतले होते. या मोर्चात अद्वय हिरे यांच्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पवार, निलेश कचवे, लकी गिल, सुधीर चव्हाण, पवन ठाकरे, अशोक बच्छाव, पं. स. सभापती प्रतिभा सूर्यवंशी, उपसभापती अनिल तेजा, सदस्य नंदूकाका शिरोळे, अशोक आखाडे, प्रदीप पगार, नानाभाऊ बच्छाव, लक्ष्मण शेलार, मुकेश पाटील, साहेबराव शेलार, मयुर सोनवणे आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.