उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:50 AM2019-11-06T00:50:31+5:302019-11-06T00:50:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात परराज्यातून होणाऱ्या मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी नियुक्त केलेल्या भरारी पथकांवरच मंगळवारी पहाटेच्या सुमारास मद्य तस्करांनी सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण गावालगत घडली आहे.

Attack on heavy squad of excise department | उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकावर हल्ला

उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकावर हल्ला

Next
ठळक मुद्देरॉड, लाठ्या-काठ्यांचा वापर : जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात परराज्यातून होणाऱ्या मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी नियुक्त केलेल्या भरारी पथकांवरच मंगळवारी पहाटेच्या सुमारास मद्य तस्करांनी सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण गावालगत घडली आहे. यात तस्करांनी हल्ला करताना लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांचा सर्रास वापर केल्याने राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी व कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर संघटितपणे सशस्त्र हल्ला चढविण्याची ही पहिलीच घटना मानली जात असून, यावरून मद्य तस्करांची मजल कितपत वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात दीव, दमण, सिल्व्हासा या केंद्रशासित राज्यातून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूची तस्करी करून आणली जात आहे. या मद्याची महाराष्टÑात विक्री, वाहतूक व साठवणूक कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे. केंद्रशासित भागात मद्यावर कुठलीही कर आकारणी होत नसल्याने मद्याच्या किमती स्वस्त आहेत, त्यामुळे त्याची तस्करी
करून चढ्या भावाने त्याची विक्री करणाºया टोळ्या जिल्ह्यात कार्यरत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांकडून वेळोवेळी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न करून आजवर कोट्यवधी रुपयांची तस्करी रोखण्यात आली आहे. त्यामुळे मद्य तस्कर संघटित झाले असून, त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मध्यरात्री मद्य तस्कर व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांमध्ये झालेली धुमश्चक्री मानली जात आहे. राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक सुरेश बाबू शिंदे यांना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास चोरटी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दिंडोरी येथील भरारी पथक याठिकाणी कारवाईसाठी रवाना झाले होते. रात्री दीड वाजेच्यास सुमारास एक पिकअप वाहन या पथकाला संशयितरीत्या आढळले. पथकाने चौकशी केली असता पिकअपमधील संशयितांनी गाडी सोडून पोबारा केला.
दरम्यान, पथकाने त्यांचा पाठलाग केला असता, मद्य तस्करांनी पुढे एका एक्सयूव्ही कारमध्ये बसून पळ काढला. या कारचा पाठलाग करत असताना रस्त्यावर दोन चारचाकी संशयितरीत्या पथकाला आढळल्या. या वाहनांची चौकशी करण्यासाठी पथक थांबले असता या संशयितांनी भरधाव एक्सयूव्ही वाहनात बसून तिथून पळ काढला. अधिक तपास सुरगाणा पोलीस ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.मोटारसायकलवरून केला पाठलागसुरगाणा तालुक्यातील उंबरठाणकडे हे पथक येत असताना पथकाचाच पाठलाग तीन मोटारसायकलस्वारांनी केला. पुढे उंबरठाण शहरालगत आल्यानंतर गावात एक स्विफ्ट कार उभी होती. तिथे काही संशयित उभे दिसले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या होत्या, त्यांनी या पथकास कोण आहात अशी विचारणा केली त्यावर पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उल्लेख करताच, मद्य तस्करांनी पथकाच्या वाहनावर लोखंडी रॉडने हल्ला चढविला. काही कळण्याच्या आतच पथकातील अधिकारी व कर्मचाºयांना मारहाण करण्यात आली. या घटनेत राज्य उत्पादन शुल्कच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Attack on heavy squad of excise department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.