कोयते, तलवारी नाचवत नाशिकमध्ये पंधरा वाहने फोडली; सशस्त्र टोळक्याचा धुडगूस

By अझहर शेख | Published: January 9, 2024 06:46 PM2024-01-09T18:46:10+5:302024-01-09T18:46:50+5:30

पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, पोलिस नाईक गोविंद भामरे करीत आहेत.

attack on vehicles in Nashik | कोयते, तलवारी नाचवत नाशिकमध्ये पंधरा वाहने फोडली; सशस्त्र टोळक्याचा धुडगूस

कोयते, तलवारी नाचवत नाशिकमध्ये पंधरा वाहने फोडली; सशस्त्र टोळक्याचा धुडगूस

मनोज मालपाणी, नाशिकरोड : देवळाली गाव येथे पूर्व वैमनस्यातून आठ ते दहा जणांच्या सशस्त्र टोळक्याने एका बंद घराला लक्ष्य केले. दरवाजा तोडून घरातील सामानाची तोडफोड करत गल्लीत उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी अशा पंधरा वाहनांचे नुकसान करत दहशत माजविल्याची घटना सोमवारी (दि.८) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उपनगर पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

देवळाली गाव, तेलीगल्ली येथील सुनावाडा येथे सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोन-तीन युवक आबा पवार या युवकाची चौकशी करण्यासाठी आले होते. दरम्यान, आबा हा सुरतला लग्नासाठी गेलेला आहे. महिनाभरापूर्वी आबा व सुरज भालेराव यांच्यात वाद झाला होता. त्यावरून सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित सुरज भालेराव, अशरफ मणियार, साहिल नायर व त्यांचे तीन-चार साथीदार हे सुना वाड्यामध्ये दुचाकीवरून हातात कोयते, तलवारी, लोखंडी सळ्या घेऊन आले. त्यांनी आबाच्या नावाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याच्या माडीवरील बंद घराचा दरवाजा तोडून आतील सामानाची तोडफोड केली. टोळक्याने घरात नासधूस केल्यानंतर गल्लीत घराबाहेर उभी असलेली वाहने पिकअप (एमएच १५, ईजी २९३९), कार (एमएच १५, बीएक्स १०१९), ॲपेरिक्षा (एमएच १५, जेए ०१५६), कार (एमएच ०३, एआर ८८७३), रिक्षा (एमएच १५, ईएच ०१७२) या वाहनांच्या समोरील बाजूच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच ॲक्टिव्हा (एमएच १५, जेजे ६१२४/एमएच १५ एफएल ४६६५/एमएच १५ सीआर ७५५९), बजाज ( एमएच १५, एआर ०३७७), डिओ मोपेड (एमएच १५, जीझेड ९०६१), ज्युपिटर (एमएच १५ जेएन ८०५९), स्प्लेन्डर (एमएच १५, सीजे ६६०२/एमएच १५, एव्ही ४१६४/एमएच ४८ एएस १६९६), डिलक्स (एमएच १५, ईएन ४४२४) या दुचाकींवर तलवार, कोयते, लोखंडी सळ्यांनी प्रहार करून तोडफोड केली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, पोलिस नाईक गोविंद भामरे करीत आहेत.
 
दुचाकीवरून समाजकंटक झाले फरार

आरडाओरड व शिवीगाळमुळे रहिवासी सचिन देशमुख, अशोक शिरोडे, बाळासाहेब जंगम, नियाज अली सय्यद, जगदीश वाघेले आदी रहिवासी घराबाहेर आले. रहिवासी घराबाहेर येऊन जमा होत असल्याचे बघत ते टोळके शिवीगाळ करत दहशत माजवत दुचाकीवरून पळून गेले. सदर घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अतिश सोन्याबापु जंगम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर संशयितांचा शोध सुरु आहे.

Web Title: attack on vehicles in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक