टोळक्याकडून पादचारी बापलेकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:13 AM2020-12-25T04:13:30+5:302020-12-25T04:13:30+5:30

संशयित नितीन बाळू फसाळे (रा. गोवर्धनगाव), गणेश राजेंद्र जाधव (रा. शिवाजीनगर) व सोमनाथ ऊर्फ सनी रघुनाथ झांजर (रा. गोदावरीनगर, ...

Attack on pedestrian Bapleka by mob | टोळक्याकडून पादचारी बापलेकावर हल्ला

टोळक्याकडून पादचारी बापलेकावर हल्ला

Next

संशयित नितीन बाळू फसाळे (रा. गोवर्धनगाव), गणेश राजेंद्र जाधव (रा. शिवाजीनगर) व सोमनाथ ऊर्फ सनी रघुनाथ झांजर (रा. गोदावरीनगर, गंगापूर रोड) या तिघांनी मिळून राहुल वाघमारे व त्याचे वडील प्रकाश वाघमारे यांना मंगळवारी (दि. २२) साई रुग्णालयाजवळ मारहाण केल्याची फिर्याद राहुल वाघमारे (रा. गंगापूर) या युवकाने दाखल केली आहे. राहुल हा त्याच्या वडिलांसमवेत आजारी आईच्या गोळ्या-औषधे घेण्यासाठी मेडिकलमध्ये जाताना जिजामाता उद्यानाच्या परिसरात उभ्या असलेल्या गुंडांच्या टोळक्याने विनाकारण त्याला त्रास देत कुरापत काढत शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी जमिनीवर पाडून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी त्याचे वृध्द वडील प्रकाश वाघमारे यांनी आपल्या मुलाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता गुंडांनी त्यांनाही दगडाने मारहाण करत जखमी केले. तसेच यापुढे ‘तू वस्तीत दिसला तर हात-पाय तोडून टाकू’ अशी धमकीदेखील दिली. याप्रकरणी राहुलने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत संशयितांविरुध्द तक्रार दिली आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

Web Title: Attack on pedestrian Bapleka by mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.