नांदगाव तालुक्यात पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 04:38 PM2020-05-11T16:38:59+5:302020-05-11T16:39:16+5:30

नांदगाव : चौकशी न करता आमच्या गावची वाहने सोडून देत जा. नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा दम देत सायगाव (बगळी), ता. चाळीसगाव, जि. जळगाव या गावातील १५ ते २० जणांनी जिल्'ातील नांदगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या आमोदे या चेक पोस्ट मध्ये कर्तव्य बजावणाऱ्या दोघा पोलिसांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांत सायगावचा पोलीस पाटील असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 Attack on police in Nandgaon taluka | नांदगाव तालुक्यात पोलिसांवर हल्ला

नांदगाव तालुक्यात पोलिसांवर हल्ला

googlenewsNext

नांदगाव : चौकशी न करता आमच्या गावची वाहने सोडून देत जा. नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा दम देत सायगाव (बगळी), ता. चाळीसगाव, जि. जळगाव या गावातील १५ ते २० जणांनी जिल्'ातील नांदगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या आमोदे या चेक पोस्ट मध्ये कर्तव्य बजावणाऱ्या दोघा पोलिसांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांत सायगावचा पोलीस पाटील असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सदर घटना रविवारी घडली. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सायगाव या गावाकडून तीन मोटार सायकलीवरून काही लोक आले. त्यांना नांदगाव तालुक्यात म्हणजे नाशिक जिल्'ात प्रवेश करायचा असल्याने परंतु त्यांच्याकडे प्रवेशासंबंधी वैध स्वरूपाची कागदपत्रे नसल्याने चेक पोस्ट वरील पोलीस नाईक अनिल शेरेकर व शिपाई प्रदीप बागुल यांनी अडवून परत माघारी पाठवले. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सायगाव कडून पुन्हा २० ते २५ लोक पायी चालत आले आणि त्यांनी डयूटीवरील पोलिसांना पुन्हा दम भरला. जिल्हा बंदी असल्याने आवश्यक कागदपत्रे असतील तरच सोडण्यात येऊ शकते असे पोलिस नाईक शेरकर यांनी त्यांना वारंवार समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अर्ध्या तासाने सायगाव बगळीचे पोलीस पाटील आबा शिंदे, गोकुळ मंडळ, युवराज शिंदे, धोंडीराम कुट्टीवाला यांचा मुलगा (नाव माहित नाही), दत्तू माळी, सुनील आहेर यांचा मुलगा (नाव माहित नाही) हे १० ते १५ जणांना घेऊन चेक पोस्ट वर आले. पोलीस पाटलाने वाहने चौकशी न करता सोडावीत असे दरडावले आणि दुपारी कोणी वाहने अडवली असे म्हणताच त्यांचे बरोबर असलेल्या सुनील आहेर यांच्या मुलाने शिपाई बागुल यांचा शर्ट फाडून व त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यानंतर गोकुळ मंडळ याने शेरेकर यांचाही शर्ट फाडून, यापुढे आमोदा चेक पोस्ट वर ड्यूटी कशी करतात ते बघतो, असा दम देत मारहाण केली. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रवेश बंदी असतानाही दमबाजी करत संबंधितांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संबंधितांनी चेकपोस्ट वरील खुर्च्या व रस्त्यावर लावण्यात आलेले अडथळेही बाजूला फेकून दिले. दोघाही पोलिसांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर करत आहेत. दोघा पोलिसांना मारहाण झाली त्यावेळी त्यांच्यासमवेत दोन शिक्षकही तेथे उपस्थित होते. त्यांच्या समक्ष हा सगळा प्रकार घडला.

Web Title:  Attack on police in Nandgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक