सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:14 AM2021-05-06T04:14:52+5:302021-05-06T04:14:52+5:30

‌ बुधवारी (दि. ५) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास‌ सोनवणे यांच्या राजीवनगर येथील कार्यालयावर आठ ते दहा मोटारसायकलवर संशयित ...

Attack on Satish Sonawane's office | सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर हल्ला

सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर हल्ला

googlenewsNext

‌ बुधवारी (दि. ५) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास‌ सोनवणे यांच्या राजीवनगर येथील कार्यालयावर आठ ते दहा मोटारसायकलवर संशयित सागर हा टोळक्याला घेऊन आला. यावेळी त्याने व त्याच्या साथीदारांनी दगडफेक करत कार्यालयाची तोडफोड सुरु केली. कार्यालयाबाहेर उभी असलेले मनपाचे शासकीय वाहनही यावेळी फोडण्यात आले.

केबल ग्राहकांकडून आलेले सुमारे साडेबारा हजार रुपये टोळक्यांनी लुटून नेले. ‘आम्ही पुन्हा रात्री येऊ तेव्हा सगळ्यांचा कार्यक्रम करू...’ असा दम देखील यावेळी टोळक्याने भरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी जमावाला शांत करत कारवाईचे ठोस आश्वासन दिले.

---इन्फो--

...तर हल्ल्याचे धाडस केले नसते

चार दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास संशयित आरोपी सागर देशमुख हा सात साथीदारांना घेऊन सोनवणे यांच्या राजीवनगर तेथील कार्यालयावर आला व तेथील कर्मचारी महाडिक यांना शिवीगाळ करून ‘तुम्हाला सर्वांना फाडून टाकतो’ असा दम दिला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत त्याचवेळी संशयित सराईत गुन्हेगार सागर देशमुखच्या मुसक्या बांधल्या असत्या तर कदाचित आजचा हल्ला टळला असता

अशीही परिसरात चर्चा आहे.

---कोट--

दहा वर्षांपूर्वी संशयित सराईत गुन्हेगार सागर देशमुख याच्या गुंडगिरीमुळे प्रभाग भयमुक्त व्हावा म्हणून प्रभागात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले तरीही संशयित देशमुख याची गुंडगिरी थांबत नाही. पोलिसांकडून त्याच्याविरुध्द कठोर कारवाई का केली जात नाही? आज त्याने माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचे ठरवून कार्यालयावर हल्ला चढविला. सुदैवाने मी त्यावेळी घरी होतो म्हणून बचावलो. देशमुखसह त्याच्या गुंडांच्या टोळीचा पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करुन कठोर कारवाई करावी अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

- सतीश सोनवणे, सभागृह नेता, मनपा

--

फोटो आर वर ०५इंदिरानगर१/२/३/४

फोटो कॅप्शन :

हल्ला करणाऱ्या गुंडांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी म्हणून इंदिरानगर पोलीस ठाण्याबाहेर महापौर सतीश कुलकर्णी, भाजपा शहर अध्यक्ष गिरीश पालवे, स्थायी समिती सभापती गणेश गीते,महापालिका सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, नगरसेवक अजिंक्य साने, मुकेश शहाणे, महेश हिरे ,साहेबराव आव्हाड यासह पदाधिकारी व कार्यकर्ते धरणे आंदोलन करीत आहे.

===Photopath===

050521\05nsk_19_05052021_13.jpg~050521\05nsk_20_05052021_13.jpg~050521\05nsk_21_05052021_13.jpg

===Caption===

हल्ला करणाऱ्या गुंडांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी म्हणून इंदिरानगर पोलीस ठाण्या बाहेर महापौर सतीश कुलकर्णी, भाजपा शहर अध्यक्ष गिरीश पालवे, स्थायी समिती सभापती गणेश गीते,महापालिका सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील नगरसेवक अजिंक्य साने, मुकेश शहाणे, महेश हिरे ,साहेबराव आव्हाड सह पदाधिकारी~हल्ला करणाऱ्या गुंडांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी म्हणून इंदिरानगर पोलीस ठाण्या बाहेर महापौर सतीश कुलकर्णी, भाजपा शहर अध्यक्ष गिरीश पालवे, स्थायी समिती सभापती गणेश गीते,महापालिका सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील नगरसेवक अजिंक्य साने, मुकेश शहाणे, महेश हिरे ,साहेबराव आव्हाड सह पदाधिकारी~हल्ला करणाऱ्या गुंडांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी म्हणून इंदिरानगर पोलीस ठाण्या बाहेर महापौर सतीश कुलकर्णी, भाजपा शहर अध्यक्ष गिरीश पालवे, स्थायी समिती सभापती गणेश गीते,महापालिका सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील नगरसेवक अजिंक्य साने, मुकेश शहाणे, महेश हिरे ,साहेबराव आव्हाड सह पदाधिकारी

Web Title: Attack on Satish Sonawane's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.