डॉक्टरांवरील हल्ल्याचा इगतपुरीत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 05:54 PM2019-06-17T17:54:20+5:302019-06-17T17:54:55+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील एसएमबीटी हॉस्पीटलच्या वतीने कोलकात्यात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन एसएमबीटी हॉस्पीटलच्या प्रवेशद्वारावर निषेध व्यक्त केला.

Attacks on the doctor | डॉक्टरांवरील हल्ल्याचा इगतपुरीत निषेध

कवडदरा येथील एसएमबीटी हॉस्पीटलच्या प्रवेशद्वारावर कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतांना एसएमबीटी येथील डॉक्टर तसेच कर्मचारी.

Next
ठळक मुद्देनांदूरवैद्य : एसएमबीटी हॉस्पीटलच्या वतीने काळ्या फिती लावून फेरी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील एसएमबीटी हॉस्पीटलच्या वतीने कोलकात्यात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन एसएमबीटी हॉस्पीटलच्या प्रवेशद्वारावर निषेध व्यक्त केला.
देशभरात जवळपास ३ लाख तर राज्यातील ४३ हजार खासगी डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा देणे बंद केले असून याच पार्श्वभूमीवर कवडदरा येथील एसएमबीटी हॉस्पीटलच्या वतीने सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला आहे. या निषेधार्थ एसएमबीटी हास्पीटलच्या प्रवेशद्वारापासून ते कवडरापर्यंत काळ्या फिती लावून निषेधफेरी काढण्यात आली.
‘मी डॉक्टर आहे देव नाही’ या घोषणेचे फलक घेऊन येथील कर्मचाºयांनी घोषणा देत फेरीत सहभागी होत प्रतिसाद दिला. या संपाला परिचारिका तसेच रेडिओलॉजी असोसिएशन यांनीही पाठिंबा दिला आहे. या हॉस्पीटलमध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी काळ्या फिती लावून दैनंदिन कामकाज केले जात होते.
याप्रसंगी एसएमबीटी हॉस्पीटलचे सर्व डॉक्टर व्यवस्थापन समितीचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Attacks on the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर