विविध रोगांचे आक्रमण : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांकडून बागा उद्ध्वस्त करण्याचा सपाटा डाळिंबाचे आगार ‘तेल्या’ने बेजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:53 PM2018-01-25T23:53:55+5:302018-01-26T00:22:45+5:30

नामपूर/सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : तांदूळवाडी ता. बागलाण तेल्यासारख्या महाभयंकर रोगाच्या आक्रमणामुळे त्रस्त ...वारंवार होणाºया सीमा बंदी तर कधी नोटाबंदी अशा सुलतानी संकटामुळे बाजारभावात होणारी घसरण.

Attacks of various diseases: Planting of paddy plantation by farmers who are tired of indebtedness; | विविध रोगांचे आक्रमण : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांकडून बागा उद्ध्वस्त करण्याचा सपाटा डाळिंबाचे आगार ‘तेल्या’ने बेजार!

विविध रोगांचे आक्रमण : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांकडून बागा उद्ध्वस्त करण्याचा सपाटा डाळिंबाचे आगार ‘तेल्या’ने बेजार!

Next
ठळक मुद्देडाळिंबाचे आगार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरशेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी

नामपूर/सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : तांदूळवाडी ता. बागलाण तेल्यासारख्या महाभयंकर रोगाच्या आक्रमणामुळे त्रस्त ...वारंवार होणाºया सीमा बंदी तर कधी नोटाबंदी अशा सुलतानी संकटामुळे बाजारभावात होणारी घसरण..... कधी गारपीट, अवकाळी पाऊस अशा अस्मानी संकटामुळे तिहेरी कात्रीत सापडून कर्जाच्या बोजाखाली दबल्या गेलेल्या बळीराजाला नैराश्य येऊन कधीकाळी आर्थिक सुबत्ता आणलेल्या डाळिंब पिकावर कुºहाड लावल्याने डाळिंबाचे आगार आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तेल्याच्या आक्रमणामुळे आणि शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे बेजार झाल्याने बागलाणमधील मोसम, तांदूळवाडी, दरेगाव, आरम, करंजाडी, काटवन खोºयातून हद्दपार होत असल्याचे भयावह चित्र निदर्शनास आले आहे. बागलाण हा तसा गिरणा, मोसम, आरम, करंजाडी, हत्ती, कान्हेरी ,दोध्याड या कधीकाळी बारमाही वाहणाºया नद्यांमुळे सुपीक तालुका. अवकाळी पाऊस आणि गारपीट ग्रहण पिछाच सोडत नसल्यामुळे शेतकºयाची अक्षरश: कमाईच बसली. लालचुटूक डाळिंबाचा आदल्या दिवशी सौदा व्हायचा आणि रात्रीतून याच पिकावर तेल्याचे आक्रमण तर कधी गारपीट अशा वारंवार येणाºया अस्मानी संकटामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत गेला.
तब्बल वीस वर्षं डाळिंबाचा बोलबाला ...
बागलाण तालुक्यात डाळिंब पीक लागवडीला शासकीय आकडेवारीनुसार राष्ट्रीय फळ लागवड योजनेंतर्गत १९९३ पासून खºया अर्थाने सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात बागलाणमधील काटवन, करंजाडी, पूर्व बागलाण व गिरणा काठ परिसरात डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात झाली. भरघोस उत्पादन आणि पैसा देणारे पीक म्हणून डाळिंब शेतकºयाच्या पसंतीस उतरले. कमी खर्चात चांगला पैसा मिळत गेल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकºयाच्या घरात अक्षरश: लक्ष्मीच नांदू लागली. पैसा आल्यामुळे शेतातील छप्परच्या घराची जागा टोलेजंग बंगल्यांनी घेतली.आर्थिक सुबत्तेमुळे अनेक शेतकºयांनी माळरान विकसित करून डाळिंब पिकाची यशस्वी शेती केली. शासकीय आकडेवारीनुसार २०१४ पर्यंत तब्बल सव्वीस हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब पिकाने व्यापले गेले. भरघोस पीक घेण्याच्या नादात आणि दुकानदारांनी कोणतेही औषध विक्रीसाठी चुकीच्या पद्धतीने दिलेल्या सल्ल्यामुळे चांगली कमाई देणाºया पिकावर तेल्यासारख्या महाभयंकर रोगाने आक्रमण केले.
नैराश्यातून हल्लाबोल ...
डाळिंबाचे हे आगार तेल्याचे आक्रमण, अवकाळी पाऊस, गारपीट या अस्मानी संकटाबरोबरच वारंवार सीमाबंद आणि नोटाबंदी या सुलतानी संकटामुळे बेजार झाल्याचे चित्र आहे. वारंवार बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान या देशांची सीमा बंद केल्यामुळे निर्यात रोखली जाते. परिणामी डाळिंबाचा उठाव कमी होऊन बाजारभाव गडगडतात. गेल्या वर्षी नोटाबंदीच्या निर्णयामुळे हवाला पद्धतीवर त्याचा मोठा परिणाम होऊन परदेशी व्यापाºयांनी काढता पाय घेतल्यामुळे डाळिंबाचा उठाव कमी होऊन त्याचे भावावर परिणाम झाले. दरम्यान, डाळिंबाला २०१३ पासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे ग्रहण लागले आहे. यामुळे तेल्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊन बागांचे बहुतांशी नुकसान झाले. सातत्याने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करूनही हातात बँकेच्या कर्जाची नोटीसच मिळते. या नैराश्यातून बळीराजाने आता पिकावरच राग काढत उभ्या पिकाला कुºहाड लावून झाड उद्ध्वस्त करण्याचा सपाटाच लावला आहे.

Web Title: Attacks of various diseases: Planting of paddy plantation by farmers who are tired of indebtedness;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी