निमगाव मढ येथे वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 12:25 AM2020-12-05T00:25:20+5:302020-12-05T00:25:42+5:30
येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील मोरे यांच्या संयुक्त गटामध्ये रानवराह या वन्यप्राण्याची शिकार करण्याच्या हेतूने संशयित नऊ आरोपींनी जाळे टाकले होते. या आरोपींना जागेवर अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पाच मोटारसायकल, बारा जाळ्या व एक भाला जप्त करण्यात आला आहे.
येवला : तालुक्यातील निमगाव मढ येथील मोरे यांच्या संयुक्त गटामध्ये रानवराह या वन्यप्राण्याची शिकार करण्याच्या हेतूने संशयित नऊ आरोपींनी जाळे टाकले होते. या आरोपींना जागेवर अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पाच मोटारसायकल, बारा जाळ्या व एक भाला जप्त करण्यात आला आहे.
वनविभागाने केलेल्या या कारवाईत देवराम अरुण चव्हाण, गणेश रघुनाथ चौधरी, गुलाब रामचंद्र पालवी, (सर्व, रा. कोल्हेर, ता. दिंडोरी), साहेबराव हरी चौधरी, मोहन चंदर चौधरी, लक्ष्मण दत्तू चौरे (सर्व, रा. पिंपरी आंचला, ता. दिंडोरी) पंडित हरी चौधरी, अनिल पुंडलिक चौरे (सर्व, रा. हिंगळवाडी, ता. कळवण), लक्ष्मण हरी मोंडे (रा. अंबानेर, ता. दिंडोरी) यांच्याविरुद्ध वन्यप्राणी संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या कारवाईमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनरक्षक प्रसाद पाटील, गोपाळ हरगावकर, पंकज नागपुरे, वनसेवक विलास देशमुख, वाहनचालक सुनील भुरुक यांनी भाग घेतला.