जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; चौघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:07 AM2019-09-24T01:07:05+5:302019-09-24T01:07:24+5:30

पत्नी दुसऱ्यासोबत विवाह करण्याच्या तयारीत असल्याचे समजून संबंधित तरुणाच्या मागे तलवार घेऊन धावणाºया इसमाला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

 Attempt to kill; All four were in custody | जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; चौघे ताब्यात

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; चौघे ताब्यात

Next

इंदिरानगर : पत्नी दुसऱ्यासोबत विवाह करण्याच्या तयारीत असल्याचे समजून संबंधित तरुणाच्या मागे तलवार घेऊन धावणाºया इसमाला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
फिर्यादी संतोष सोमवंशी यांच्या घरी जेवणाचा कार्यक्र म होता. त्यामुळे त्यांची मामेबहीण ही कुटुंबीयांसह आली होती. रात्री १२ वाजेच्या सुमारास सोमवंशी यांच्या घरी चुलत भावाबरोबर संशयित शशिकांत आढाव आला व त्याने त्यांच्या मामेबहिणीला दमबाजी करत ‘तू येथे काय करतेस’ असा जाब विचारत रागाने घरातून निघून गेला, मात्र सोमवंशी कुटुंबीयांसमवेत घरात बसलेले असताना संशयित आढाव पुन्हा त्याच्या दोन साथीदारांसह त्यांच्या घरात प्रवेश केला. सोमवंशी यांच्यावर लाकडी दंडुक्याने हल्ला चढविला. तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत सोमवंशी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या दिशेने ‘वाचवा वाचवा...’ असे ओरडत धावू लागले. यावेळी संशयित आढाव हा त्याच्या साथीदारांसह चारचाकी वाहनातून भरधाव वेगाने त्यांचा पाठलाग करत असताना वाहनाची धडक पथदीपाला बसली. यावेळी आढाव याने हातात तलवार घेत वाहनातून खाली उतरत थेट पोलीस ठाण्याजवळच सोमवंशी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाच्या गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक पाटील यांच्या सदर प्रकार लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. सोमवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आढावसह त्याचा साथीदार संदीप ऊर्फ बंटी आढाव (३१), सिद्धार्थ थोरात (२७), शुभम गायकवाड (१९), प्रतीक आढाव (१९, सर्व रा. शिर्डी) यांना अटक केली आहे.

Web Title:  Attempt to kill; All four were in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.