विरगाव जिल्हा बँकेला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 05:34 PM2019-03-04T17:34:30+5:302019-03-04T17:44:48+5:30

विरगाव : बँकेत ठेवलेल्या ठेवींसह गोरगरीब जनतेचे पैसेही बँकेतून परत मिळत नसल्याने वैतागलेल्या विरगाव वाशीयांनी अखेर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरगाव शाखेला सोमवारी सरपंच ज्ञानेश्वर देवरे यांच्या नेतृत्वाखाली कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्राहकांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहचिवण्याचे आश्वासन दिल्यानंतर बँकेतील कर्मचारी वर्गाने आपली सुटका करून घेतली.

Attempt to lock the lock of Viraganga District Bank | विरगाव जिल्हा बँकेला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न

विरगाव जिल्हा बँकेला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे बँक अपयशी ठरत असल्याने खातेदारांमधून तीव्र संताप व्यक्त केला

विरगाव : बँकेत ठेवलेल्या ठेवींसह गोरगरीब जनतेचे पैसेही बँकेतून परत मिळत नसल्याने वैतागलेल्या विरगाव वाशीयांनी अखेर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरगाव शाखेला सोमवारी सरपंच ज्ञानेश्वर देवरे यांच्या नेतृत्वाखाली कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्राहकांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहचिवण्याचे आश्वासन दिल्यानंतर बँकेतील कर्मचारी वर्गाने आपली सुटका करून घेतली.
नोटबंदी दरम्यान गोरगरीब जनतेने जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा केलेले पैसे अडीच वर्षे उलटूनही मिळत नसल्याने या बँकेतील खातेदार पूर्णपणे वैतागले आहेत. तसेच बँकेत ठेवलेल्या लाखो रु पयांच्या ठेवीही परत देण्यास बँक अपयशी ठरत असल्याने खातेदारांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याचीच परिणीती म्हणून या बँकेत दररोज ग्राहक व बँक कर्मचारी यांच्यात तीव्र स्वरूपाचे वादविवाद होत असून सोमवारी यातूनच बँकेला थेट कुलूप ठोकण्याचा प्रयत्न झाला.
सोमवारी महाशिवरात्री निमित्त बँकेला सुट्टी असतांनाही कार्यालयीन कामकाजा निमित्ताने बँक चालू होती. यावेळी एका त्रस्त ग्राहकाने बँकेत ठेवलेल्या ठेवींविषयी बँक प्रशासनाकडे मागणी केली. मात्र नेहमीप्रमाणेच बँक कर्मचार्यांनी या ग्राहकाला उडवाउडवीची उत्तरे दिल्याने यावेळी जोरदार खडाजंगी झाली. याप्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर देवरे यांनी यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्राहकांचे यावेळी समाधान न झाल्याने जोपर्यंत जनतेचा पैसा परत मिळत नाही तोपर्यंत बँकेचे कुलूप उघडणार नाहीत अशी भूमिका खातेदारांनी घेतल्याने तीव्र तणाव निर्माण झाला होता.
याप्रसंगी बँक कर्मचारी वर्गाने झुकते घेत ग्राहकांच्या भावना वरिष्ठ पातळीवर तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्यापर्यंत पोहचिवण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुलूप ठोकण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला. यावेळी, बळी गांगुर्डे, भगवान आहिरे, संजय गांगुर्डे, साहेबराव चित्ते, मयुर चित्ते आदींसह ग्राहक उपस्थित होते.
(फोटो नाशिक एनडीसीसी बॅँक)

Web Title: Attempt to lock the lock of Viraganga District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक