पित्याकडून शाळकरी मुलीला किटकनाशके पाजण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 06:19 PM2019-07-21T18:19:44+5:302019-07-21T18:22:06+5:30

माता-पित्याच्या नाते जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते; मात्र या कलियुगात या नातेसंबंधालाही काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत.

An attempt of paternal uncle from the father to the school girl | पित्याकडून शाळकरी मुलीला किटकनाशके पाजण्याचा प्रयत्न

पित्याकडून शाळकरी मुलीला किटकनाशके पाजण्याचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्दे धक्कादायक प्रकार रविवारी (दि.२१) शिंदे गावात उघडकीस आला. शैक्षणिक साहित्यांची मागणी वडिलांकडे केली. त्याचा राग

नाशिक : ज्या मुलांना जन्माला घातले त्या किशोरवयीन मुलांना बळजबरीने चक्क जन्मदात्या पित्याने विष पाजण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.२१) शिंदे गावात उघडकीस आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित पित्याविरूध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल क रण्यात आला आहे.
‘माृत-पितृ देवो भव:’ अशी आपली संस्कृती असून आई-वडिलांना सर्वोच्च दर्जा दिला जातो. माता-पित्याच्या नाते जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते; मात्र या कलियुगात या नातेसंबंधालाही काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. काही दिवसांपुर्वीच चिमुकलीला आईने गळ्यावर ब्लेडने वार करून ठार मारल्याची संतापजनक घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास गती घेत नाही तोच पुन्हा शिंदे गावात बळजबरीने पित्याने आपल्या शाळकरी मुलीच्या तोंडात किटकनाशके टाकून ठार मारण्याचा केलेला प्रयत्नही तितकाच संतापजनक आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पंढरीनाथ बाबुराव बोराडे (४८,रा. शिंदेगाव) याने आपल्या लहान मुलामुलींना बळजबरीने विषारी किटकनाशके पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. मुलीने शैक्षणिक साहित्याच्या मागणी केल्यामुळे संतापलेल्या मद्यपी बापाने तीला बळजबरीने किटकनाशके पाजण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यावेळी घरात मुलांची आई नव्हती. याप्रकरणी पित्याविरूध्द मुलाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या बहिणीने शाळेचा गणवेश, पाठ्यपुस्तके आदि शैक्षणिक साहित्यांची मागणी वडिलांकडे केली. त्याचा राग येऊन संश्यित पंढरीनाथ याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जनावरांच्या गोठ्यात असलेल्या रोगर किटकनाशकाची भरलेली बाटली आणून मुलीच्या तोंडात बळजबरीने ओतण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत भावाने म्हटले आहे.
काही दिवसांपुर्वीच आपल्या स्वत:च्या १४महिन्यांच्या चिमुकलीला आईनेच विनाकारण ठार मारल्याची घटना औरंगाबादरोडवर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. तसेच काही महिन्यांपुर्वी रूग्णालयातच अवघ्या तीन ते चार दिवसांच्या नवजात चिमुरडीचा जन्मदात्री आईने गळा आवळून खून केल्याचीही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर शिंदे गावातील या घटनेने पुन्हा एकदा आई-वडिलांच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न केल्याने संताप व्यक्त होत आहे.२ याप्रकरणी पुढील तपास सहायक निरिक्षक के.एल.सोनोने करीत आहेत.

Web Title: An attempt of paternal uncle from the father to the school girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.