दुचाकी अडवून पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न

By admin | Published: May 19, 2017 01:01 AM2017-05-19T01:01:55+5:302017-05-19T01:02:33+5:30

दुचाकी अडवून पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न

Attempt to rob a bag of money while trying to rob money bag | दुचाकी अडवून पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न

दुचाकी अडवून पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दुचाकीवरून पैशाची बॅग घेऊन जाणाऱ्या दोघांना खुटवडनगर परिसरात अडवून लुटण्याचा प्रयत्न झाला; मात्र या दोघांपैकी एकाने लुटारूंचा धाडसाने प्रतिकार केल्याने भामट्यांनी दोघांनाही लोखंडी रॉडने मारहाण करीत पळ काढला.
सीटू भवन परिसरातील विशाल विसपुते हे मंगळवारी सकाळी शालक सागर थोरात यास सोबत घेऊन पैसे घेण्यासाठी एका ठिकाणी गेले होते. साडेनऊ वाजेच्या सुमारास ते दोघे दुचाकीने घराकडे परतत असताना खुटवडनगर परिसरात त्यांना काही लुटारूंनी अडवून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी विशाल विसपुते यांनी लुटारूंना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लुटारूंनी दोघांनाही लोखंडी सळईने मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत प्रतिकार करणारे विसपुते जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्यासोबत असलेले त्यांचे शालक सागर अशोक थोरात (२३) रा. अष्टविनायकनगर, शिर्डीरोड, सिन्नर यांनी याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भरदिवसा लूटमार सीटू भवन येथील स्वप्न होम बंगल्याशेजारून जात असताना एका दुचाकीवरून आलेल्या तीन भामट्यांनी विसपुते यांच्या हातातील बॅग पळविण्याचा प्रयत्न केला; मात्र विसपुते यांनी त्यांना प्रतिकार केला असता तिघांपैकी एकाने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून पोबारा केला. भरदिवसा झालेल्या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Attempt to rob a bag of money while trying to rob money bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.