शिरपुरात पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न, दरोडेखोरांकडून काचा फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 11:13 AM2021-09-15T11:13:05+5:302021-09-15T11:16:11+5:30
१५ रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान दहिवद फाट्याजवळील मुंबई-आग्रा महामार्ग लगत असलेला स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर ८ ते १० दरोडेखोरांनी चाल करून कॅबीनचा काचा फोडून रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला.
नाशिक/ शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील दहिवद फाट्यानजिक असलेला स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर भल्या पहाटेच्या सुमारास ८ ते १० दरोडेखोरांनी हौदास घालून पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल पंपाच्या कॅबीनसह एका वाहनाच्या काचा देखील त्यांनी फोडल्या आहेत. सहचालकाने लोखंडाची टॅमी उगरल्याने ते पळून जाण्यास यशस्वी झालेत.
१५ रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान दहिवद फाट्याजवळील मुंबई-आग्रा महामार्ग लगत असलेला स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर ८ ते १० दरोडेखोरांनी चाल करून कॅबीनचा काचा फोडून रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोखंडी कॅबीन असल्यामुळे मध्ये झोपलेले २ कर्मचारी घाबरून त्यांनी दरवाजा उघडला नाही. ते शेवटपर्यंत घाबरून लपून राहिले. दरोडेखोरांनी किमान १५ ते २० मिनिटे कॅबीनवर हल्ला केला. मात्र प्रतिसाद काहीच मिळाला नाही़
त्याचवेळी पेट्रोल पंपासमोर मालट्रक क्रमांक एम़एच़०४-जेके-८३१२ ही पार्किंगमध्ये उभी होती. चालक राजेश चौहान व सहचालक प्रेमजीत चौहान हे दोघे गाडीच्या कॅबीनमध्येच झोपले होते. त्यावेळी चालक राजेश चौहान यास झोपेतून अचानक जाग आली, त्यामुळे त्याने गाडीच्या कॅबीनमधील लाईट लावला़ हे दरोडेखोरांच्या लक्षात येताच त्यांनी वाहनावर देखील दगडफेक करीत दोन्ही बाजुचा काचा फोडल्या. त्यानंतर दरोडेखोरांनी चालकावर चाकूचा हल्ला केल्यामुळे त्यास डाव्याबाजूस कंमरेजवळ मोठी दुखापती झाली. त्याचवेळी सहचालकाला जाग आल्यामुळे त्याने तो प्रकार पाहताच त्याने गाडीतील लोखंडी टॅमी काढत दरोडेखोरांवर चाल केली, ते पाहून दरोडेखोर पळून जाण्यास यशस्वी झाले.
दरम्यान, काही दरोडेखोर पेट्रोल पंपाच्या पाठीमागील शेतातून तर काही समोरील हायवेने पसार झालेत. दरोडेखोर २५ ते ३० वयोगटातील असून त्यांनी तोंडाला रूमाल व अंगात फक्त बनियन होते. त्यानंतर घटनेची माहिती थाळनेर पोलिसांना देण्यात आली. मात्र, माहिती दिल्यानंतर ते तब्बल एका तासानंतर घटनास्थळी आलेत. तोपर्यंत तेथे फक्त काचाचा चुराडा झालेला दिसला. दरोडेखोरांकडू चाकू व गावठी कट्टा असल्याचे सांगण्यात येते, ते सीसीटीव्ही कैद झालेत आहेत.