सिन्नरला ट्रक टर्मिनलचा भूखंड विकण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 01:29 AM2021-07-17T01:29:16+5:302021-07-17T01:29:54+5:30

सिन्नर, माळेगाव औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेल्या भूखंडावर तातडीने ट्रक टर्मिनल उभारावा, अशी मागणी उद्योजकांनी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Attempt to sell truck terminal plot to Sinnar | सिन्नरला ट्रक टर्मिनलचा भूखंड विकण्याचा प्रयत्न

सिन्नरच्या राखीव भूखंडावर ट्रक टर्मिनल उभारण्याच्या मागणीचे निवेदन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना देताना रतन पडवळ, बबन वाजे, राजेश गडाख, आशिष नहार, प्रवीण वाबळे, राहुल नवले, सुधाकर देशमुख, अतुल अग्रवाल, किरण वाजे आदी.

Next
ठळक मुद्देउद्योजकांचा आरोप : ट्रक टर्मिनल उभारण्याची मागणी

सातपूर : सिन्नर, माळेगाव औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेल्या भूखंडावर तातडीने ट्रक टर्मिनल उभारावा, अशी मागणी उद्योजकांनी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

सिन्नर औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनलसाठी सुमारे चार एकरचा भूखंड आरक्षित केला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करूनही उपयोग होत नाही. आता मात्र, हा भूखंडच विकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा उद्योजकांनी आरोप केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून हा भूखंड विकसित करण्याबाबत कुठलेही पावले उचलले नाहीत. ट्रक टर्मिनलअभावी वसाहतीत अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये काहींना कायमचे अपंगत्वही आले आहे. हा भूखंड विकसित करण्यासाठी माळेगाव ग्रामपंचायतीने एमआयडीसीला प्रस्तावदेखील दिला आहे. मात्र, अशातही त्यावर कुठल्याही प्रकारची ठोस कृती झाली नाही. माळेगाव एमआयडीसीत केएसबी पंप्स, जिंदाल सॉ, भगवती स्टील अशा मोठ्या कंपन्यांचे जाळे आहे. या कंपन्यांमध्ये येणारा माल तसेच उत्पादन बाहेर पाठविण्यासाठी अवजड वाहनांची नियमित वाहतूक होत असते. यामुळे अपघाताच्या घटना होत असल्याने तातडीने या भागात ट्रक टर्मिनल उभारण्याची गरज असल्याची मागणी उद्योजकांनी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे रतन पडवळ, बबन वाजे, राजेश गडाख, अजय बाहेती, आशिष नहार, प्रवीण वाबळे, राहुल नवले, सुधाकर देशमुख, अतुल अग्रवाल, रवी पाटील, मारुती कुलकर्णी, पंकज निकम, संजय राठी, किरण वाजे आदींसह उद्योजकांनी केली आहे.

 

Web Title: Attempt to sell truck terminal plot to Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.