वरिष्ठ स्तर न्यायालयासाठी प्रयत्न
By admin | Published: March 25, 2017 10:29 PM2017-03-25T22:29:01+5:302017-03-25T22:29:20+5:30
इगतपुरी : तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आणि धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या संपादित जमिनींसह संभाव्य संपादन होणाऱ्या जमिनींबाबतचे अनेक दावे न्यायालयात प्रलंबित आहे.
इगतपुरी : तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आणि धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या संपादित जमिनींसह संभाव्य संपादन होणाऱ्या जमिनींबाबतचे अनेक दावे न्यायालयात प्रलंबित आहे. अशा दाव्यांना तत्काळ निकाली काढण्यासाठी इगतपुरी न्यायालयात नव्या दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या मंजुरीसाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी इगतपुरी वकील संघाला दिले. इगतपुरी तालुका वकील संघ बार असोसिएन आणि न्यायालयाच्या वार्षिक तपासणी कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पक्षकारांना पिण्याचे पाणी, कॅँटिंगसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, इगतपुरीत न्यायाधीश व वकिलांचे संबंध चांगले असल्याने पक्षकारांना योग्य न्याय मिळत असून, अनेक दावे निकाली निघाले आहेत. तालुका वकील संघ बार असोसिएनचे अध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अॅड. एन. पी. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. युवराज जाधव यांनी समस्या मांडल्या. यावेळी इगतपुरी तालुका वकील संघ बार असोसिएनच्या वतीने ढवळे यांना निवेदन देण्यात आले. बार संघाचे तालुकाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, उपाध्यक्ष अॅड. शेख मोहम्मद अकबर चांद, सचिव यशवंत व्ही. कडू, सहसचिव अॅड. कैलास शिरसाठ, ग्रंथपाल अॅड. जितेंद्र शिंदे, सहग्रंथपाल अॅड. सुनील रोकडे, खजिनदार अॅड. सागर वालझाडे, लेखापरीक्षक अॅड. मुन्ना पवार, सदस्य अॅड. ओमप्रकाश भरिंडवाल, अॅड. सुशील गामपूर, अॅड. एन. एच. कातोरे, अॅड. प्रीती चांडक, प्रगती सुरते, बी. एन. वाजे, अॅड. एस. बी. पावर, युवाराज जाधव, एन. के. वालझाडे, डी. बी. खातळे, नदीम शेख, निलेश चांदवडकर, सोमनाथ भोसले, एस. एस. वाजे, विजय कर्नावट, एस. सहाणे, डी. एस. रवातळे, सतीश खडेलवाल, पंढरीनाथ गायकर, राजाराम जाधव आदि वकील उपस्थित होते. (वार्ताहर)