भावलीचे पाणी रोखण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 04:48 PM2018-10-26T16:48:36+5:302018-10-26T16:48:52+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातून जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला शुक्रवारी इगतपुरी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी कडवा विरोध करीत आक्र मक आंदोलन केले.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातून जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला शुक्रवारी इगतपुरी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी कडवा विरोध करीत आक्र मक आंदोलन केले. आमदार निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी भावली धरणाचे सोडण्यात आलेले पाणी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. तर शिवसेनेने माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली पाणी सोडू न देण्यासाठी कालपासून सुरु केलेले ठिय्या आंदोलन शुक्रवारीही कायम ठेवल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून मेंगाळ यांच्यासह दीडशे शिवसैनिक आणि शेतकºयांना ताब्यात घेतले.
जलसंपदा विभागाने गुरुवार (दि.२५) पासून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकरीता इगतपुरीतील दारणा धरण समूहातील वाकी खापरी,भाम,व भावली धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली. सदर पाणी दारणा धरणात येणार असून दारणातून जायकवाडी करीता विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान सदर पाणी सोडल्यानंतर इगतपुरीतील सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी संतप्त झाले. त्यांनी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी आमदार निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे गोरख बोडके,उमेश खातळे, मनसेचे संदीप किर्वे,मूळचंद भगत,रामदास आडोळे,कैलास भगत आदींच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी भावली धरणावर येत प्रचंड घोषणाबाजी केली आणि पाणी रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, दारणा धरणातून जायकवाडीला एक थेंब पाणी देणार नाही असा आक्र मक पवित्रा घेत कालपासून मेंगाळ यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते.आज दुसºया दिवशीही आंदोलन चालू ठेऊन आंदोलक जलसमाधी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असताना पोलिसांनी आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत मेंगाळ यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.